वृद्धाचा कोरोनाने मृत्यू, श्रीवर्धन नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी रचले सरण

दिनेश पिसाट
रविवार, 25 एप्रिल 2021

कोरोनाच्या वैश्विक महामारीने सारे जग कवेत घेतले आहे. कोरोना विषाणू ने मानवी मर्यादा अधोरेखित केल्या आहेत. संपूर्ण जीवन मी शब्दाने व्यापले असता सरतेशेवटी मी पणा मध्ये कमावलेले काहीच कामाला असे येत नाही हे स्पष्ट झाले आहे .

श्रीवर्धन : कोरोनाच्या वैश्विक महामारीने सारे जग कवेत घेतले आहे. कोरोना विषाणू ने मानवी मर्यादा अधोरेखित केल्या आहेत. संपूर्ण जीवन मी शब्दाने व्यापले असता सरतेशेवटी मी पणा मध्ये कमावलेले काहीच कामाला असे येत नाही हे स्पष्ट झाले आहे . मानवी आचार विचार आणि कृती याचे स्पष्ट पणे दर्शन   कोरोना काळात घडतं आहे. मनुष्य आणि समाज याचे नाते पूर्वापार चालत आलेले आहे. मात्र कोरोना विषाणूने मनुष्याला समाजापासून दूर नेल्याचे दिसून येते. Shriwardhan Corporation Workers performed last rites of Senior Citizen

हिंदू मुस्लिम ख्रिश्चन  कोणत्याही समाजात अंत्यविधी, श्राद्ध  यांना अतिशय महत्त्व आहे. श्राद्ध न घातल्यास  स्वर्गातील पूर्वजांना त्रास होतो किंबहुना ती आपणास त्रास देतात अशा विविध कल्पना अनेक समाजात आहेत.  मात्र या सर्व कल्पनांना, या विचारांना कोरोनाने काही काळासाठी तरी गायब केल्याचे दिसून येत आहे. दक्षिण रायगड Raigad मधील श्रीवर्धन Shriwardhan शहरातील एका वयोवृद्ध व्यक्तीचा  कोरोनाने Corona बाधित होऊन मृत्यू झाला. संबंधित वयोवृद्ध व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी नगरपालिका प्रशासनाला स्मशानभूमी कडे मार्गक्रमण करावे लागले. रात्रीच्या गडद  अंधारात श्रीवर्धन नगरपालिकेच्या कर्मचारी आणि मुख्याधिकारी किरणकुमार मोरे  या कर्मचाऱ्यांनी कोरोनाने बाधित होऊन मृत्यू झालेल्या  व्यक्तीचे सरण रचले. 

ना समाज, ना नातेवाईक शेवटच्या क्षणाला अग्नि देणारा फक्त मुलगा व त्याचा एक मित्र आणि नगरपालिकेचे कर्मचारी असे मनाला चटका लावणारे भयानक दृश्य श्रीवर्धनच्या स्मशानभूमीत निदर्शनास आले. पेटणाऱ्या चिते सोबत मानवी मर्यादांची रेषा आकुंचन पावत असल्याचा भास मात्र निश्चितच निर्माण झाला आहे. Shriwardhan Corporation Workers performed last rites of Senior Citizen

समाज आणि मनुष्य या दोघांमधील दरी कोरोनाच्या  विषाणूमुळे निश्चितच प्रदीर्घ होत चालली आहे . वेळेवर कोरोना प्रादुर्भावाला रोखणे अगत्याचे आहे अन्यथा  समाज नावाची व्यवस्था लयाला जाण्यास वेळ लागणार नाही. समाजातील प्रत्येक व्यक्तीने  कोरोनाला रोखण्यासाठी आपले नैतिक कर्तव्य बजावणे गरजेचे आहे.
Edited By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live