‘वर्क फ्रॉम होम’ मुळे होतोय पाठीचा आणि मानेचा त्रास ? एकदा 'या" टिप्स नक्की फॉलो करून पहा !

साम टीव्ही ब्युरो
शनिवार, 22 मे 2021

कोरोना विषाणूच्या संकटामुळे आज बर्‍याच क्षेत्रात ‘वर्क फ्रॉम होम’ च्या माध्यमातून काम करण्यास परवानगी दिलेली आहे. कोरोनाच्या पहील्या लाटेपासून सुरु झालेलं वर्क फ्रॉम होम अजून सुद्धा काही ठिकाणी सुरूच आहे. वर्क फ्रॉम होममुळे आपल्याला बराचवेळ एकाच जागेवर बसून काम करावे लागते.

मुंबई : कोरोना Corona विषाणूच्या संकटामुळे कॉर्पोरेट क्षेत्रात Corporate Sector आज ‘वर्क फ्रॉम होम’ Work from Home च्या माध्यमातून काम केले जात आहे. काही कंपन्यांमध्ये बर्‍याच कालावधीपासून ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू आहे. कोरोनाच्या पहील्या लाटेपासून First Wave सुरु झालेलं वर्क फ्रॉम होम अजून सुद्धा काही ठिकाणी सुरूच आहे. वर्क फ्रॉम होममुळे आपल्याला बराचवेळ एकाच जागेवर बसून काम करावे लागते. Side effects of Work from home and some exercise tips for this 

वर्क फ्रॉम होम सुरू असल्याने आपली आठ तासांची शिफ्ट कधी नऊ-दहा तासांची होऊन जाते हे आपल्यालाही समजत नाही. या वर्क फ्रॉम होम मुळे सतत एकाच जागेवर बसून काम करावे लागते आणि तसे केल्यामुळे अनेकांना शरीराच्या अनेक समस्या निर्माण होत आहेत. त्यामध्ये विशेष करून पाठीच्या आणि मानेच्या दुखण्याच्या अनेक समस्या उद्धभवत आहेत. 

हे देखील पहा -

त्यामुळे या दुखण्यासाठी घरात राहून नेमका काहीतरी व्यायाम करायला हवा जेणेकरून या त्रासापासून मुक्ती भेटेल असे प्रत्येकाला वाटत असणार. कोणता व्यायाम करावा हा अनेकांना पडलेला प्रश्न आहे. आज तुम्हाला काही खास व्यायाम शेअर करणार आहोत. ते केल्याने तुम्ही निरोगी राहाल तसेच बसून बसून तुमचे वजन देखील वाढणार नाही. आणि विशेष म्हणजे वर्क फ्रॉम होमच्या सतत एक ठिकाणी बसून राहावे लागत असल्यामुळे तुमच्या पाठीवर जो ताण येत आहे, तो ही हळूहळू व्यायामांमुळे दूर होईल. Side effects of Work from home and some exercise tips for this 

बहुतेक लोकांना असे वाटते की, दोरीवरच्या उड्या मारणे फक्त लहान मुलांसाठी असते. किंवा उंची वाढवण्यासाठी असते, पण प्रत्येक वयोगटातील लोकांनी दोरीवरच्या उड्या मारल्या पाहिजेत. Side effects of Work from home and some exercise tips for this 

विनाकारण रस्त्यावर टवाळखोरी करणाऱ्या 13 टवाळखोरांची रॅपिड टेस्ट पॉझिटिव्ह

दोरीवरच्या उड्या मारणे हा एक सोपा व्यायाम आहे, ज्यामुळे हृदयाचे ठोके सुधारतात. यामुळे आणि हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोकाही कमी होतो. वजन कमी करण्यासाठी देखील या दोरीवरच्या उड्याचा व्यायाम खूप फायदेशीर आहे. यामुळे आपले वजन देखील कमी होते आणि शरीराची हालचाल देखील होते. दोरीवरच्या उड्या मारताना किमान दोन ते तीन तास तुम्ही काही खाल्ले नसावे. अथवा तुमच्या पोटात त्रास होऊन पोट दुखू शकते. Side effects of Work from home and some exercise tips for this 

दुसरा व्यायाम म्हणजे, एक काठी घ्या . पायाने सरळ उभे राहा. दोन्ही पायांमध्ये थोडे अंतर ठेवा. हातातील काठी मानेमागे खांद्यावर ठेवा. आणि त्या भोवती दोन्ही हात खांद्याच्या रेषेत सरळ करा आणि दोन्ही हाताने काठी धरा. हळूहळू श्वास सोडत डावीकडे पहा. आणि कुठल्याही प्रकारचा मानेला हिसका न देता, अतिशय सावकाश डावीकडे वळा. श्वास थांबावे. त्यानंतर सावकाश सरळ व्हावे. असेच उजव्या बाजूने करावे. ही क्रिया तीनदा करावी.

वर्क फ्रॉम होममुळं घरातून काम करणाऱ्यांच्या कामाचे तास वाढले जाते. अनेकजण कामाच्या निर्धारित तासांपेक्षा एक ते दोन तास अधिकच काम करतात. असे दिसून येते. या संकल्पनेमुळं नवीन कौशल्य Skills शिकण्याच्या क्षमतेवरही परिणाम होतो. नवीन काही काम कौशल्य आपल्याला शिकता येत नाही.  वर्क फ्रॉम होम साठीच्या करण्यात आलेल्या सर्वेत 64 टक्के लोकांनी त्यांना आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्याचे सांगतिले. 75 टक्के लोकांनी वर्क फ्रॉम होममुळे त्यांचे काही प्रमाणात मानसिक संतुलन बिघडल्याचे देखील सांगतिले आहे.  Side effects of Work from home and some exercise tips for this 

Edited By- Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live