यंदा कडक उन्हाळ्याचे संकेत, तब्येत सांभाळा कारण

साम टीव्ही
गुरुवार, 4 मार्च 2021

मार्चच्या पहिल्याच आठवड्यात उन्हाचे चटके बसू लागलेत. विदर्भ मराठवाड्यात तापमानाचा पारा चाळीशीच्या घरात गेलाय. उन्हाळ्यात तब्येत सांभाळा असा सल्ला डॉक्टर देऊ लागलेत.

मार्चच्या पहिल्याच आठवड्यात उन्हाचे चटके बसू लागलेत. विदर्भ मराठवाड्यात तापमानाचा पारा चाळीशीच्या घरात गेलाय. उन्हाळ्यात तब्येत सांभाळा असा सल्ला डॉक्टर देऊ लागलेत.

यंदा जानेवारी फ्रेब्रुवारी महिन्यात हिवाळा पावसाळ्याचा खेळ सुरु होता. पण मार्च महिना सुरु होताच सूर्य तळपू लागलाय. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातल्या तापमानाच्या पाऱ्यानं चाळीशी गाठलीय. येत्या काही दिवसांत पारा चाळीशीपार जाण्याची शक्यता आहे.

तापमान वाढू लागल्यानं ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी असं आवाहन तज्ज्ञांनी केलंय. कोरोनाचा प्रकोप कायम असल्यानं खबदारी घ्या असं डॉक्टर सांगतात. कोरोना आहे त्यात उन्हाळा हा उन्हाळा सामान्यांची परीक्षा पाहाणारा ठरणार आहे.

फोटो

संबंधित बातम्या

Saam TV Live