pension.jpg
pension.jpg

कौटुंबिक निवृत्तीवेतन नियमांत महत्त्वाच्या सुधारणा; वाचा सविस्तर

मुंबई : कोविड Covid 19  महामारीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने  कौटुंबिक निवृत्तीवेतन नियमांचे Family pension rules सुलभीकरण केल्याची घोषणा केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग Dr. Jitendra Singh यांनी आज नवी दिल्लीत केली. नियमात बदल करण्यासाठी लागणारी औपचारिक प्रक्रिया पूर्ण होण्याची प्रतीक्षा न करता पात्र कुटुंब सदस्याकडून कौटुंबिक निवृत्तीवेतन Pension आणि मृत्यू प्रमाणपत्र Death certificate मिळाल्यानंतर तात्काळ तात्पुरते कौटुंबिक निवृत्तीवेतन मंजूर करण्याची तरतूद  करण्यात आले, अशी माहिती निवृत्तीवेतन आणि निवृत्तिवेतनधारक  कल्याण विभागाच्या वतीने  डॉ. जितेंद्र सिंह यांनी दिली. (Significant improvements to family pension regulations; Read detailed)

याबाबत बोलताना डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की,  कोविड 10 महामारी दरम्यान कोविडमुळे किंवा बिगर कोविड कारणामुळे मृत्यू झालेल्यांसाठी ही तरतूद लागू करण्यात आली आहे. निवृत्तीवेतन अधिनियमानुसार, सेवेत असतानाच सरकारी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास, कौटुंबिक निवृत्तीवेतन  अधिदान व लेखा कार्यालयाकडे पाठविल्यानंतरच कुटुंबातील पात्र सदस्याला तात्पुरते कौटुंबिक निवृत्तीवेतन मंजूर केले जाईल.  मात्र सध्याची महामारीची परिस्थिती लक्षात घेता पात्र कुटुंबातील पात्र सदस्याकडून कौटुंबिक निवृत्तीवेतन आणि मृत्यूच्या  प्रमाणपत्र  मिळाल्यानंतर ते अधिदान व लेखा कार्यालयाकडे पाठविण्यापेक्षा ते लगेचच संबधित कुटुंबाला मंजूर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. असेही डॉ. जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे.

त्याचबरोबर कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर अधिदान व लेखा कार्यालयाच्या संमतीने आणि विभागप्रमुखांच्या मंजुरीनंतर  सेवानिवृत्तीच्या तारखेपासून एक वर्षापर्यंत संबंधित कुटुंबाला तात्पुरते निवृत्तीवेतन देण्याची मुदत वाढवण्याची महत्त्वपूर्ण तरतूद आहे.

निवृत्तीवेतन कायद्यानुसार, संबंधित सरकारी कर्मचारी त्याचे निवृत्तीवेतन निश्चित होण्यापूर्वी सेवानिवृत्त होण्यापूर्वी सहा महिन्यांसाठी तात्पुरते निवृत्तीवेतन मंजूर केले जाते. मात्र  कोविड महामारी पाहता  कागदपत्रे सादर करण्यास उशीर झाला तर नियमानुसार, तात्पुरते कौटुंबिक निवृत्तीवेतन देण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचेही यावेळी डॉ. जितेंद्र सिंह यांनी स्पष्ट केले आहे.

त्याचबरोबर, निवृत्तीवेतन आणि निवृत्तिवेतनधारक कल्याण विभाग वेळोवेळी निवृत्तिवेतनधारक आणि ज्येष्ठ नागरिकांशी संबंधित प्रत्येक समस्येला अतिशय संवेदनशीलतेने हाताळत असून त्यात अनेक सुधारणंही केल्या जात आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com