मनसेच बदलाचे संकेत, राज ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 22 जानेवारी 2020

मुंबई : राज्यात बदलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही कात टाकणार आहे. येत्या 23 जानेवारी रोजी पक्षाच्या होणा-या अधिवेशनात राज ठाकरे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच पक्षात मोठया प्रमाणात बदल होणार असल्याचे मनसे नेत्यांनी संकेत दिले आहेत. 

गेल्या अनेक दिवसांपासून मनसेच्या पक्षाचा झेंडा आणि अजेंडा बदलण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. मनसे अधिकृत ट्विटर हॅंडलवरुन पक्षचिन्हाच्या मागे असलेला झेंडा हटवत मनसेकडून तसे संकेतही देण्यात आले आहेत. 

दरम्यान, मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्विट करत अप्रत्यक्षपणे अन्य पक्षातील कार्यकर्त्यांना पक्षप्रवेशाचे निमंत्रण दिले आहे. "अळूचं फदफदं हवं की मिरचीचा ठेचा?' असा सवाल संदीप देशपांडे यांनी ट्विटच्या माध्यमातून विचारला आहे. "मंत्रालयातील गोड गोड अळूचं फदफदं आवडतं की शेतावरची मिरची ठेचा आणि भाकरी. निर्णय तुमचा, मराठा तितुका मेळावा महाराष्ट्र धर्म वाढवावा, असे ट्विट संदीप देशपांडे यांनी केले आहे. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे 23 जानेवारी रोजी काय भूमिका घेणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र ते त्यांच्या पक्षाचा झेंडा बदलणार हे नक्की झाल्याची चर्चा असून झेंडयावर फक्त रेल्वे इंजिनच ठेवले जाणार असल्याचे समजते. 

WebTittle ::  Signs of change by MNS, attention to the role of Raj Thackeray

संबंधित बातम्या

Saam TV Live