अंबाजोगाईत कोरोनामुळे मृत झालेल्या 23 रुग्णांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार ( पहा व्हिडिओ )

beed news
beed news

बीड -   सध्या महाराष्ट्रात Maharashtra कोरोना Corona विषाणूनं थैमान घातलं आहे. राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येसोबतच आता मृतांच्या Death आकडेवारीतही मोठ्या प्रमाणातही वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. बीड Beed जिल्ह्यात कोरोनाचा वाढता आकडा चिंताजनक Worrying असताना आता मृत्युदर Deathrate देखील वाढला आहे. दोन दिवसांमध्ये तब्बल 30 कोरोनाबाधित  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  अंबाजोगाई तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. वाढत्या रुग्णसंख्येसोबतच मृतांची संख्याही वाढत असल्याने येथे भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. शनिवार व रविवार या दोनच दिवसात अंबाजोगाईत ambajogai कोरोनामुळे मृत झालेल्या 25 रुग्णांवर नगरपरिषदेने अंत्यसंस्कार केले.   Simultaneous cremation of 23 patients who died of corona

यात 23 जणांना अग्नीडाग तर 2 जणांचा दफनविधी करण्यात आलाय. तर दोन दिवसात तब्बल 1800 जणांनी कोरोनावर मात केली आहे.  सध्या अंबाजोगाईतील स्वाराती आणि लोखंडीच्या कोविड सेंटरमध्ये मिळून हजार पेक्षाही अधिक कोरोना बाधितांवर उपचार सुरु आहेत. तर, अनेक जण गृह विलगीकरणात उपचार घेत आहेत. दररोज शेकडो रुग्ण कोरोनामुक्त होत असल्याचे चित्र दिलासादायी असले तरी दुसऱ्या लाटेतील मृत्यूंची आकडेवारी मात्र चिंतेत भर घालणारी आहे.

बीड जिल्ह्यात सध्या ॲक्टिव रुग्णांची संख्या आठ हजारांच्या घरात आहे.  कोरोना पॉझिटिव्हचा दर आणि मृत्यूचा दर देखील वाढला आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांवर अंत्यसंस्कार करत असताना देखील मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.  

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com