एकाच वेळी लोहमार्ग पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकासह आठ कर्मचारी निलंबीत !

pune railway police
pune railway police

पुणे -  पुणे स्टेशन  Pune Station येथील लोहमार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांच्यासह आठ जणांना अंमली पदार्थ Acidic Substance प्रकरणी अप्पर पोलिस महासंचालक प्रज्ञा सरवदे यांनी तडकाफडकी निबंलीत केले आहे. Simultaneously Eight employees including a senior inspector of Lohmarg police station, were suspended

नववर्षाच्या पार्श्वभुमीवर चरस हिमाचल प्रदेशातून रेल्वे मार्गाने महाराष्ट्र आणि इतर राज्यात विक्रीसाठी आलेल्या दोघांना लोहमार्ग पोलिसांनी मागील वर्षी (2020) अटक केली होती. त्यांच्याकडून एक कोटी तीन लाख रूपयांचा 34 किलो 404 ग्रॅम चरस जप्त केला होता. हा चरस मुंबई, पुणे, गोवा, बंगळुरू येथे नववर्षाच्या पार्श्वभुमीवर विक्रीसाठी वितरीत केला जाणार होता.

हे देखील पहा - 

या चरसची आंतरराष्ट्रीय बाजार पेठेत 120 कोटी रुपये असल्याचे त्यावेळी लोहमार्ग पोलिसांनी सांगितले होते. ललितकुमार दयानंद शर्मा 49 वर्षीय आणि कौलसिंग रुपसिंग सिंग 40 वर्षीय जिल्हा कुल्लू येथील या दोघांना त्यावेळी  अटक करण्यात आली होती.  

या दोघांवर लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुरुवातीला हा तपास लोहमार्ग पोलिस ठाण्याकडे होता. मात्र त्यावेळी त्यांनी तपासात अनियमितता केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. 

या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावण्यासाठी एटीएसकडे हा तपास सोपवण्यात आला होता. एटीएसने संबंधीत कारवाईच्या आधारे पुढे देखील कारवाई केली होती. त्यानंतर आता याच प्रकरणात पोलिस अधिकाऱ्यासह आठ जणांना निलंबीत करण्यात आले आहे.

Edited By - Puja Bonkile  

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com