सिंधी-पंजाबी-शिख समाजातर्फे कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांसाठी लंगर सेवा सुरू

सचिन आगरवाल
शुक्रवार, 28 मे 2021

हॉटेल बंद असल्यामुळे जेवणाच्या समस्याना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे त्यांची ही समस्या लक्षात घेता सिंधी-पंजाबी समजातर्फे गुरुद्वारामध्ये लंगर सेवा सुरू केली आहे. 

अहमदनगर -  सध्या राज्यासह नगर जिल्ह्यात कोरोना रुग्ण Corona patient वाढत आहेत . त्यातच रुग्णांना patient दवाखान्यात Hospital भरती केल्यानंतर नातेवाईकांच्या Relatives जेवणाची समस्या निर्माण होत आहे. विशेष म्हणजे बाहेर गावाहून शासकीय रुग्णालयात Government Hospital आलेल्या नातेवाईकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे नातेवाईकांना Relatives दोन वेळच अन्न मिळावं तसेच शहरातील गरजू लोकांना पोट भर अन्न मिळावे या उद्देशाने अहमदनगरमधील Ahmednagar गुरुद्वारातर्फे Gurudwara लंगर सेवा सुरू केली आहे. तसेच जेवणाच्या पाकीट सोबत पाण्याची बॉटल्स देखील त्यांना पुरवल्या जात आहेत. Sindhi-Punjabi community launches Langar seva for Corona relatives 

हे देखिल पहा - 

 

कोरोना रुग्ण रुग्णालयात भरती केल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांची जेवणाची बिकट परिस्थिती होते. हॉटेल बंद असल्यामुळे जेवणाच्या समस्याना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे त्यांची ही समस्या 
लक्षात घेता सिंधी-पंजाबी-शिख समजातर्फे गुरुद्वारामध्ये लंगर सेवा सुरू केली आहे. 

शासकीय रुग्णालय, खाजगी रुग्णालय आणि रस्त्यावर उपाशी पोटी फिरणाऱ्याणा हे अन्नांचे पाकीट या गुरुद्वरेच्या सेवक वाटप करत असतात असे सतींदर सिंग नारंग यांनी माहिती दिली आहे. 'कोरोना परस्थितीमध्ये अनेकांना वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. अहमदनगर गुरुद्वारातर्फे या कठीण काळात मदत करत आहेत. कोणीही उपाशी राहता कामा नये हे काम या समाज बंधावांतर्फे केले जाते.' संग्राम जगताप असे ते म्हणाले .

लाखो रुपयाचे टरबूज मातीमोल लॉकडाउनचा फटका टरबुज पिकांवर

विशेष म्हणजे गरजूंना किराणा, रुग्णाच्या घरी गॅस सिलिंडर आणि औषधे देखील घरपोच करण्याचं काम या सेवा समिती तर्फे करण्यात येते. अश्या परिस्थितीत अहमदनगरच्या या गुरुद्वारातर्फे केल्या जाणाऱ्या या कार्याचे कौतुक होत आहे. 

Edited By - Puja Bonkile 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live