एमपीएससीचे उमेदवार अडकले मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीत

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 15 सप्टेंबर 2019

 

2017 च्या राज्यसेवा परीक्षेचा निकाल मे 2018 रोजी जाहीर करण्यात आला आहे. यातून शासनातील महत्त्वाच्या वर्ग 'अ' व वर्ग 'ब' पदाकरिता एकूण 377 उमेदवारांची निवड करण्यात आली.

 

2017 च्या राज्यसेवा परीक्षेचा निकाल मे 2018 रोजी जाहीर करण्यात आला आहे. यातून शासनातील महत्त्वाच्या वर्ग 'अ' व वर्ग 'ब' पदाकरिता एकूण 377 उमेदवारांची निवड करण्यात आली.

 राज्यसेवा परीक्षा 2017 मधील उमेदवारांना लोकसेवा आयोगाकडून बुधवारी (ता.11) शिफारसपत्र प्राप्त झाले. अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी शुक्रवारी (ता.13) नियुक्ती आदेश देतो, असे आश्वासनही विद्यार्थ्यांना दिले होते. तरी अद्यापही उमेदवारांना नियुक्तीपत्र मिळालेले नाही. सदर आदेश मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीसाठी थांबवल्याचे त्यांनी विद्यार्थ्यांना समजवले. त्यामुळे उमेदवारांच्या भावना अनावर झालेल्या आहेत, असे मत एमपीएससी परीक्षेचे उमेदवार सागर ढवळे यांनी व्यक्त केले. 

2017 च्या राज्यसेवा परीक्षेचा निकाल मे 2018 रोजी जाहीर करण्यात आला आहे. यातून शासनातील महत्त्वाच्या वर्ग 'अ' व वर्ग 'ब' पदाकरिता एकूण 377 उमेदवारांची निवड करण्यात आली. अशा उमेदवारांची निवड मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल झालेल्या समांतर आरक्षण याचिकेमुळे रखडली होती. या याचिकेचा निकाल 8 ऑगस्ट 2019 रोजी लागला. 

 

न्यायालयीन निकालानंतरही सुधारित निवड यादी प्रसिद्ध करण्यास एक महिना लागला. याकरितादेखील सहा सप्टेंबरला विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उमेदवारांना आंदोलन करावे लागले होते. आचारसंहिता लागण्यापूर्वी नियुक्ती न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा उमेदवारांनी दिलेला आहे. मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेत तत्काळ सामान्य प्रशासनास नियुक्तीचे आदेश द्यावेत, अशी विनंती ढवळे यांनी केली आहे.

 

Web Title: Sitaram Kunte said that the MPSC candidates had not received the appointment letter due to signature of the CM


संबंधित बातम्या

Saam TV Live