मुंबईची परिस्थिती दिवसेंदिवस कठीण, कंंटेन्मेंट झोनही वाढवले...

मुंबईची परिस्थिती दिवसेंदिवस कठीण, कंंटेन्मेंट झोनही वाढवले...
गेल्या दोन दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या मुंबईत मोठ्या संख्येनं वाढली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील कंटेनमेन्ट झोनही वाढवण्यात आले आहे. चेंबूर, वडाळा, माहीम आणि दादरसह धारावीत कंटेनमेन्ट झोन्स वाढवण्यात आलेत. तर अंधेरी पश्चिमेतील कंटेनमेन्ट झोन्स कमी कऱण्यात आलेत. 2 मे रोजी मुंबईत 1 हजार 523 असणारे कंटेनमेन्ट झोन्स आता 2 हजार 83 इतके करण्यात आले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण हे मुंबईत आहे. मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा 9 हजारच्या वर गेला आहे. एकूण 9 हजार 310 कोरोना रुग्ण झाले आहेत. सोमवारी एकाच दिवसात 510 नवीन कोरोना रुग्ण आढळ्याने खळबळ माजली आहे. सोमवारी 18 जणांचा कोरोनामुळे बळी गेलाय. मुंबईत कोरोनाचे 510 नवीन रुग्ण सापडल्यामुळे बाधितांचा आकडा 9123 झाला. आणखी 18 रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे कोरोनाबळींची संख्या 361 वर गेली. नव्या रुग्णांची संख्या वाढतच असल्याने चिंता कायमच आहे. सोमवारी (ता. 4) मुंबईत कोव्हिड-19 विषाणूची लागण झालेले 510 नवीन रुग्ण आढळल्याने बाधितांची संख्या 9123 झाली. दगावलेल्या 18 जणांपैकी 10 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते, तर तिघांचा मृत्यू वार्धक्‍याशी संबंधित असल्याचे सांगण्यात आले. मृतांमध्ये 14 पुरुष व 4 महिलांचा समावेश आहे. त्यापैकी दोघांचे वय 40 वर्षांपेक्षा कमी, एकाचे वय 40 वर्षांहून अधिक, 9 रुग्णांचे वय 60 वर्षांहून जास्त, तर 7 रुग्णांचे 40 ते 60 वर्षांदरम्यान होते. मुंबईतील मृतांचा एकूण आकडा 343 झाला आहे. एकूण 436 नवीन संशयित रुग्ण सापडले असून, आतापर्यंत 11,900 संशयित रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोमवारी 104 कोरोनामुक्त व्यक्तींना रुग्णालयांतून घरी पाठवण्यात आले. आतापर्यंत 1908 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबई व उपनगरे रेड झोनमध्ये असल्याने व काही व्यवहार सुरू झाल्याने नागरिकांनी सर्व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रतिबंधित क्षेत्रांत कोरोनाच्या रुग्णांचा शोध घेण्यासाठी 255 विशेष दवाखाने सुरू करण्यात आले आहेत. आतापर्यंत 11 हजार 592 व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले असून, त्यांच्यापैकी 3713 संशयित रुग्णांचे थ्रोट स्वॅब नमुने घेण्यात आले आहेत. त्यांतील 853 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती महापालिकेने दिली. कोरोना रोखण्यासाठी वरळीतील पॅटर्न सर्वत्र राबवावा का, असा प्रश्‍न तावडे यांना विचारला. त्यावर तेथील खरा आकडा लपवला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. आपण वरळीतील नागरिकांच्या संपर्कात आहोत. त्यामुळे सरकारने खरा आकडा जाहीर करावा, अशी मागणीही त्यांनी केली. मुलुंडमध्ये एकाच दिवसांत 55 नवीन रुग्ण मुंबईतील सेफ झोन असलेल्या मुलुंडमध्ये एकाच दिवसात 55 नवीन कोरोना रुग्ण आढळले. त्यातही इंदिरा नगर वस्तीत 36 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे मुंबईत जवळपास सर्वच भागांत विशेषत: झोपडपट्टी परिसरात कोरोना हातपाय पसरत असल्याची चिंताजनक बाब समोर येत आहे. इंदिरा नगर हा झोपडपट्टीचा परिसर असून गेल्या तीन, चार दिवसांपासून या परिसरात कोरोना रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे महापालिकेने या भागातील नागरिकांची युद्ध पातळीवर तपासणी सुरू केली आहे. त्यात येथे सोमवारी 36 रुग्ण आढळल्याने महापालिकेने हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केला आहे. इंदिरा नगरबरोबरच रामग्रह तसेच मुकुंद परिसरातून प्रत्येकी दहा रुग्ण आढळले आहेत.हे. खासगी शाळा ताब्यात झोपडपट्ट्यांमध्ये कोरोनाचा रुग्ण पसरल्यास त्यावर नियंत्रण मिळवण्यात अडचणी येतात. या दाटीवाटीच्या परिसरात सामाजिक अंतर पाळणे हेच सर्वात मोठे आव्हान आहे. केंद्रीय पथकानेदेखील झोपडपट्ट्यांमधील अतिजोखमीच्या व्यक्तींना पालिकेच्या इमारतींमध्ये क्वारंटाईन करण्याचा सल्ला दिला आहे. त्यानुसार या भागातील एक पालिका आणि एक खासगी शाळाही ताब्यात घेण्यात येणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com