एका इटालियन महिलेला दिले फायझर कोविड लसीचे सहा डोस !

साम टीव्ही ब्युरो
मंगळवार, 11 मे 2021

कोविडच्या या पर्वात घडणाऱ्या काही अनैतिक घटनांच्या मालिकेत एक कधीच न ऐकलेली गोष्ट समोर आली आहे. एका 23 वर्षीय इटालियन महिलेने अलीकडेच फायझर-बायोटेन टेक लसीचे सहा डोस घेतले आहेत. 

कोविडच्या Covid 19 या पर्वात घडणाऱ्या काही अनैतिक घटनांच्या मालिकेत एक कधीच न ऐकलेली गोष्ट समोर आली आहे. लसीसंदर्भात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक सामान्य प्रश्न विचारले जातात. म्हणजे दोन डोस पुरेसे आहेत की नाही ? वेगवेगळ्या कंपन्यांचे डोस मिसळले जाऊ शकतात की नाही ? आणि एक डोस किती प्रभावी आहे ? परंतु या इटालियन महिलेमुळे कदाचित यापुढील सर्व लसी संदर्भात प्रश्नांची उत्तरे देण्यास समर्थ बनली आहे. एका 23 वर्षीय इटालियन Italy महिलेने अलीकडेच फायझर-बायोटेन टेक Pfizer-Biotin Tech लसीचे सहा डोस घेतले आहेत.  Six doses of Pfizer covid vaccine mistakenly given to an Italian woman

हे देखील पहा -

बातमी एजन्सी एजीआयने सोमवारी दिलेल्या वृत्तानुसार महिलेला चुकून डोस प्राप्त झाला होता. सुदैवाने, लसच्या सहा पूर्ण डोस घेतल्यानंतर महिलेला कोणताही दुष्परिणाम Side Effects झाला नाही. तिला अति प्रमाणात लस मिळाल्यानंतर लवकरच तिची स्तिथी सुनिश्चित करण्यासाठी तिला पाणी आणि पॅरासिटामोल देण्यात आले.

परबांच्या चौकशीची सोमय्यांची मागणी पूर्ण करण्याची तयारी - सत्तार

 

एका नर्सने चुकून डोसऐवजी लसीची संपूर्ण कुपी इंजेक्शन मध्ये भरली आणि तेव्हा लस देण्यात चूक झाली. ज्याचे प्रमाण लसच्या सहा डोस इतके आहे. यापूर्वी प्रमाणापेक्षा जास्त लस अशी कोणतीही घटना यापूर्वी घडली नव्हती. आतापर्यंत नोंदविलेल्या फायझरसाठी सर्वात जास्त प्रमाणात चार डोसची नोंदणी झालेली आहे.

एएफपीने AFP देशाच्या औषध नियामकांना या घडलेल्या घटनेची माहिती कळविली आहे. इस्रायल, ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि जर्मनीसह अनेक देशांनी फायझर लसीच्या अतिरेकाची नोंद केली आहे.

Edited By- Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live