धुळ्यातल्या एकाच ठाण्यातील १६ पोलीस कर्मचाऱ्यांनी केली कोरोनावर यशस्वी मात

भूषण अहिरे
सोमवार, 24 मे 2021

शहरामधील आझाद नगर पोलीस ठाण्याच्या तब्बल सोळा पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांना कोरोनाच्या संकट काळामध्ये आपले कर्तव्य बजावत असताना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते

धुळे : शहरामधील Dhule City आझाद नगर पोलीस ठाण्याच्या Police Station तब्बल सोळा पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांना कोरोनाच्या संकट काळामध्ये आपले कर्तव्य बजावत असताना कोरोनाची Corona लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर या सर्वच्या सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांनी कोरोनावर यशस्वीपणे उपचार घेऊन मात केली आहे. Sixteen Police Personnel From Dhule Now Corona Free

हे सर्व कर्मचारी पुन्हा एकदा आपले कर्तव्य बजावण्यासाठी पोलिस ठाण्यामध्ये Police Station हजर देखील झाले आहेत. या सर्व पोलिस कर्मचाऱ्यांनी कोरोनावर मात केल्यामुळे पोलिस ठाण्यामध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण बघावयास मिळत आहे.

हे देखिल पहा

कोरोनाची दुसरी लाट सुरू असताना आपले कर्तव्य वाजवण्यासाठी हे सर्व पोलिस कर्मचारी व अधिकारी अहोरात्र आपली सेवा देत कोरोना पासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी रस्त्यावरती आपले कर्तव्य बजावत असताना त्यांना कोरोना ची लागण झाली होती. Sixteen Police Personnel From Dhule Now Corona Free

उल्हासनगरमध्ये २० रुपयांसाठी एकाची हत्या

परंतु मोठ्या हिमतीने या सर्व पोलीस बांधवांनी कोरोनावर मात केली असून पुन्हा आपल्या कर्तव्य पार पाडण्यासाठी हे पोलीस कर्मचारी व अधिकारी कामावर देखील रुजू झाले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

 Edited By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live