झोपा आणि कमवा, वाचा झोप घेऊन पैसा कसा मिळवाल?

साम टीव्ही
मंगळवार, 1 सप्टेंबर 2020

झोपणे हा जर तुम्हा तुमचा जन्मसिद्ध हक्क समजत असाल, तर तुमच्यासाठी एक नोकरीची संधी आहे. तुम्ही विचार करु शकताय. कारण झोपण्यासाठी तुम्हाला 1 लाख रुपये मिळणार आहेत

झोपणे हा जर तुम्हा तुमचा जन्मसिद्ध हक्क समजत असाल, तर तुमच्यासाठी एक नोकरीची संधी आहे. तुम्ही विचार करु शकताय. कारण झोपण्यासाठी तुम्हाला 1 लाख रुपये मिळणार आहेत. ही बातमी वाचा...
लॉकडाऊनमध्ये बेरोजगार झाला असाल. किंवा घरात राहून दिवसभर झोपा काढायला सवकला असाल. तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी असू शकतेय. कारण झोपेसाठीच तुम्हाला पगार मिळणार आहे. थोडा थोडका नाही. तर लाखभर रुपयांचा.
हेडर- हे काम आहे तरी काय ?

 • इंटर्नशिप करणाऱ्याला 9 तास झोपावं लागेल
 • बेडवर पडल्यानंतर 10-20 मिनिटांतच झोपाचंय
 • लागोपाठ 100 दिवस झोपलात 1 लाख रुपये मिळतील
 • कंपनी तुमच्या झोपेच्या पद्धतीवर लक्ष ठेवेल

इंटर्नशिप करणाऱ्या व्यक्तीला रोज 9 तास झोपायचंय. बेडवर पडल्या पडल्या तुम्हाला 10-20 मिनिटांच झोपावं लागेल. लागोपाठ 100 दिवस झोपलात तर तुम्हाला याचे 1 लाख रुपये मिळतील. यादरम्यान कंपनी तुमच्या झोपेच्या पद्धतीवर लक्ष ठेवेल.

हे काम आपल्यासाठीच आहे, असं तुम्हाला वाटू लागलं असेल. तर कंपनीच्या काही अटीही आहेत, ज्या तुम्हाला मान्य कराव्या लागतील. 

हे काम मिळवायचं कसं?

 • वेकफिट असं या कंपनीचं नाव आहे
 • ही कंपनी मूळची बंगळुरुची आहे. 
 • तुम्हाला थेट कंपनीकडे अर्ज करावा लागेल.
 • ही इंटर्नशिप मिळवण्यासठी डीग्रीची आवश्यकता नाही
 • सोशल मीडियावर कमी वेळ घालवत असाल, तर तुम्हाला प्राधान्य मिळेल
 • शाळा, कॉलेजात झोपला असाल तर तुम्ही या जॉबसाठी परफेक्ट आहात म्हणून समजा
 • कोरोनाच्या संकटात असं काही समोर येणं म्हणजे मजाच!


संबंधित बातम्या

Saam TV Live