छोट्या व्यापाऱ्यांना  मोदी सरकारकडून मोठं गिफ्ट! 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

 

 

नवी दिल्ली: केंद्र सरकारने छोट्या व्यापाऱ्यांना मोठा दिलासा आहे. पुढील वर्षापासून वस्तू आणि सेवा कर (GST) भरण्यासाठी व्यापारी फोनवरुन फक्त एसएमएस पाठवून जीएसटी रिटर्न फाइल करु शकणार आहेत. या सुविधेचा फायदा घेण्यासाठी एक अटही घालण्यात आली आहे. यात व्यापाऱ्यांचा टर्नओव्हर जिरो असले पाहिजे. याशिवाय, लहान व्यापाऱ्यांसाठी सहज आणि सुगम फॉर्ममध्ये तीन महिन्यात एकदा रिटर्न भरावा लागणार आहे.हिंदू बिजनेस लाइनमध्ये दिलेल्या रिपोर्टनुसार, नवीन सिस्टमनुसार असेसी निल टर्नओव्हर असणाऱ्या व्यापाऱ्यांना फक्त एसएमएस पाठवावा लागणार आहे आणि त्यांच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर वन टाइम पासवर्ड (OTP) येईल. या ओटीपीला परत पाठवल्यास व्यापाऱ्यांचे रिटर्न भरले जाईल. 

जीएसटी नेटवर्कचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश कुमार यांनी सांगितले की, व्यापाऱ्यांनी जीएसटी नंबर घेतला आला आहे. मात्र, त्यांना रिर्टन फाइल करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी एक नवीन यंत्रणा तयार करण्यात आली आहे. असे करदाता आपल्या नोंद केलेल्या मोबाईल नंबरवरून फक्त एसएमएस पाठवून आपला रिटर्न भरू शकतात.प्रकाश कुमार यांनी सांगितले की, वार्षिक टर्न ओव्हर 5 कोटी रुपयांपर्यत असलेल्या व्यापाऱ्यांना आधी जीएसटी एन 3 फॉर्म (GSTR 3B) भरण्यास अडचणी येत होत्या. मात्र, आता व्यापाऱ्यांसाठी दोन फॉर्म तयार करण्यात आले आहेत. जे व्यापारी वर्षाला 5 कोटी रुपयांपर्यंत उलाढाल करतात आणि  बी2सी (B2B) व्यवसाय करतात, त्यांच्यासाठी आरईटी-2 (RET-2) फॉर्म तयार करण्यात आला आहे.
यालाच सहज नाम दिले आहे. यामध्ये व्यापाऱ्यांना करत तर प्रत्यके महिन्याला भरावा लागणार आहे. मात्र, रिटर्न तीन महिन्यात भरावा लागणार आहे. अशा प्रकारे वर्षाला पाच कोटी रुपयांपर्यत उलाढाल करतात, असे व्यापारी जे फक्त मोठ्या वस्तू विकतात किंवा बी2बी व्यवसाय करतात, त्यांच्यासाठी जीएसटी आरईटी-3 किंवा सुगम फॉर्म तयार करण्यात आला आहे. हा फॉर्म सुद्धा तिमाही पद्धतीने भरले जाईल. मात्र, कर महिन्याला भरावे लागणार आहे. 
 

Web Title: small traders can file gst return via sms


संबंधित बातम्या

Saam TV Live