अरे देवा! दुचाकीच्या पेट्रोल टाकीतून दारुच्या बाटल्यांची तस्करी

Smuggling of 500 bottles of liquor under the seat of two wheeler during lockdown period
Smuggling of 500 bottles of liquor under the seat of two wheeler during lockdown period

भंडारा : लॉकडाउन Lockdown काळात तस्करी Smuggaling करण्यासाठी कोण काय शक्कल लढवेल त्याच्या नेम नाही बुवा. अशीच एक अतरंगी शक्कल भंडाऱ्यात Bhandara लॉकडाउन काळात लढवली आहे. दुचाकीच्या पेट्रोलच्या टाकीत तसेच सीट खाली 500 देशी दारूचे पव्हे 500 bottles of liquor लपवून दारू बंदी असलेल्या चंद्रपुर Chandrapur जिल्हात तस्करी करण्यात येत होती. या आरोपीला भंडारा जिल्ह्याच्या पवनी Pauni पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून अटक केली आहे.  Smuggling of 500 bottles of liquor under the seat of two wheeler during lockdown period

एका आरोपीला यात अटक करण्यात आली आहे. शिवराज चिनकम वेरपुरी (वय 38) रा. चंद्रपुर अशा अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडे 13 हजाराची 500 बाटल्या दारु, गाडी असा 33 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

हे देखील पहा -

पवनी पोलिसांना मोटारसायकलनी दारूची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्या आधारे पोलीस स्टेशन हद्दीतील कोदूर्ली गावानजीक सापळा रचून पोलीस पथक तैनात ठेवण्यात आले होते. याच रस्त्याने जात असलेल्या आरोपी शिवराज बंगाली कॅम्प डी आर सी क्लब जवळ आझाद चौक चंद्रपूर मध्ये त्याच्या मालकीच्या काळ्या रंगाच्या सुझुकी जीएस 150 स्टार गाडीची पोलिसांनी चौकशी केली. चौकशी केली असता त्याने मोटारसायकलने घटना स्थळावरून पळ काढला. 

पोलिस ही त्याच्या मागावर जात, मोटार सायकलचा आठ किमी पर्यंत पाठलाग करीत गोसिखुर्द Gosikhurd धरणाच्या उजव्या कालव्याच्या कोदूर्ली पुलाजवळ त्याला पकडले. आरोपीला पकडले असता शक्कल लढवीत मोटारसायकल च्या पेट्रोल टंकीत, सीट खाली  90 एम एल चे 500 बाटल्या असे एकूण 13,500 रुपयाचा मुद्देमाल आणि 20000 रुपये लपवून ठेवले होते. त्यामुळे एवढ्या किमतीचा मुद्देमाल आरोपीकडून जप्त करण्यात आला आहे. Smuggling of 500 bottles of liquor under the seat of two wheeler during lockdown period

या आरोपीला अटक करत दारू बंदी कायद्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे पकडण्यात आलेल्या दारूच्या बॅच नं. 186 एप्रिल 2021च्या साहाय्याने सदरचा माल पवनीतील कोणत्या दुकानातील आहे याचा शोध पवनी पोलिसांकडून घेतला जात आहे.

Edited By- Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com