कोरोना पॉझिटिव्ह दांपत्याच्या मुलींना सामाजिक कार्यकर्ते बाळा बांगर यांचा आधार

विनोद जिरे
बुधवार, 12 मे 2021

पाटोद्याच्या कोविड सेंटरमध्ये एका मुंडे नावाच्या दांपत्यावर उपचार सुरू आहेत. मात्र त्यांच्यावर उपचार सुरू असतांना, त्यांच्या 2 चिमुकल्या मुली मात्र घरीच होत्या. यादरम्यान कोविड सेंटरमधील रुग्णांच्या मदतीसाठी आलेल्या बाळा बांगर यांच्यासमोर मुंडे दांम्पत्यांनी ही कैफियत मांडली. त्यांनी तात्काळ पाटोदा तालुक्यातील पाचंग्री गाव गाठलं आणि त्या मुंडे दांपत्याच्या दोन्ही चिमुकल्यांना सोबत घेऊन आधार दिलाय.

बीड : कोरोनाने Corona संपूर्ण जग विस्कळीत झालं आहे. आज अनेक कुटुंब उध्वस्त झाले आहेत, कित्येक मुलं अनाथ झाली आहेत तर अनेकांना आपला म्हातारपणाचा आधार गमवावा लागलाय. एका एका कुटुंबातील चार-चार माणसं या कोरोनाने मृत्युमुखी पडली आहेत. कोरोनामुळे अनेक कुटुंबात भयाण सुन्नता पसरलीय तर अनेकांना आपलं घर, आपली चिमुकली मुलं वाऱ्यावर सोडून कोविड सेंटरमध्ये राहावं लागत आहे.Social activist Bala Bangar's support to the children of Corona Positive

या सर्व संकटात कित्येक नाती दुरावली गेली आहेत. अनेकांना इच्छा असून या कोरोनाच्या महामारीत मदत करता येत नाही. मात्र कुणी खितपत पडलं असेल, कुणी आपले जन्मदात्या आई वडिल आता येतील या आशेने रस्त्याकडे टक लावून पहात असेल. तर त्यांना आज आपल्या आधाराची गरज आहे आणि याच पीडितांचा आधार बनलाय, बीडच्या Beed  पाटोदा Patoda तालुक्यातील भायाळा गावचा तरुण सामाजिक कार्यकर्ता बाळा बांगर Bala Bangar.

हे देखील पहा -

बाळा बांगर यांचा नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. त्यामध्ये ते सांगत आहेत की पाटोद्याच्या कोविड सेंटरमध्ये Covid Center एका मुंडे नावाच्या दांपत्यावर उपचार सुरू आहेत. मात्र त्यांच्यावर उपचार सुरू असतांना, त्यांच्या 2 चिमुकल्या Child मुली मात्र घरीच होत्या. त्यातच त्यांची कोविड तपासणी करण्याचा प्रश्न मुंडे दांपत्याला सतावत होता. Social activist Bala Bangar's support to the children of Corona Positive

मात्र त्यांना तपासणीसाठी कुणीच आणत नव्हतं. तर यादरम्यान कोविड सेंटरमधील रुग्णांच्या मदतीसाठी आलेल्या बाळा बांगर यांच्यासमोर मुंडे दांम्पत्यांनी ही कैफियत मांडली. त्यांनी तात्काळ पाटोदा तालुक्यातील पाचंग्री गाव गाठलं आणि त्या मुंडे दांपत्याच्या दोन्ही चिमुकल्यांना सोबत घेऊन आधार दिलाय.

या सई आणि अमृता दोन्ही चिमुकलींना सोबत घेऊन त्यांची कोविड टेस्ट देखील केलीय. सुदैवाने त्या दोघीपण निगेटिव्ह आल्या असून त्यांना नॉन कोविड सेन्टरमध्ये ठेवण्यात आलंय. 

कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना खासदार भावना गवळींकडून मोफत भोजन व्यवस्था

दरम्यान, गेल्या वर्षभरापासून तरुण सामाजिक कार्यकर्ता असणाऱ्या बाळा बांगर यांनी स्वखर्चातून ग्रामीण भागातील नागरिकांची सेवा सुरू केली आहे. ज्यांना गरज असेल त्यांच्या मदतीला प्रशासनाच्या अगोदर पोहचण्याचं काम ते करत आहेत.

लोकप्रतिनिधींनी आज ग्रामीण भागातील नागरिकांना आधार देण्याची गरज आहे. मात्र ते मदतीला येत नाहीत हे दुर्दैव आहे अशी व्यथा बांगर यांनी मांडली. जीवनभर कमावलेली संपत्ती शेवटी कोणाच्याही कमल येणार नाही असे मत देखील त्यांनी व्यक्त केले. त्यामुळे जग कोरोना संकटाशी झुंझत असताना प्रत्येकाने माणुसकी धर्म पाळला पाहिजे असे बांगर म्हणाले. Social activist Bala Bangar's support to the children of Corona Positive

जर मला या प्रकारचे सामाजिक काम करताना मरण जरी आले तर मी त्याला पुण्याचं समजेल, शौर्याचं समजेल असे उद्गार देखील त्यांनी यावेळी काढले. दरम्यान त्यांच्या या कामाची पाटोदा परिसरात चांगलीच चर्चा सुरू असून सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या कामातून दिलासा आणि प्रेरणा मिळत आहे. 

Edited By - Krushna Sathe 


संबंधित बातम्या

Saam TV Live