रमजान ईद निमित्त मुस्लिम बांधवांनी जपली सामाजिक बांधिलकी

Shirur
Shirur

खेड : कोरोना Corona महामारीच्या संकट काळात ऑक्सिजनचा  Oxygen तुटवडा लक्षात घेऊन शिरुर Shirur तालुक्यातील कुरुळी गावात मुस्लिम Muslim बांधवांनी रमजान ईद  Ramadan Eid साधेपणात साजरी केली आहे. रमजान ईद निमित्त मुस्लिम बांधवांनी सामाजिक बांधिलकी Social commitment जपत गावातील प्रत्येक नागरिकाला एक झाड Tree Plant भेट देऊन ते गावात लावून त्याची जोपासना करण्याची शपथ घेतली आहे. 

रमजान ईदला शिरखुरमा करुन मुस्लिम बांधव मोठ्या उत्साहात हा सोहळा साजरा करत असतात. यंदा मात्र देशावर आलेले कोरोना महामारीचे संकट लक्षात घेऊन रमजानचा हा उत्सव साधेपणात करण्याचा निर्णय कुरुळी गावातील मुस्लिम बांधवांनी घेतला.

हे देखील पहा -

सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून कोरोना महामारीशी सुरु असलेल्या लढाईत सहभाग घेत वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेतला आहे . यामध्ये सर्व मुस्लिम बांधवांनी देशभरातील मुस्लिम बांधवाना सामाजिक बांधिलकी जपण्याचे आवाहन केले.

कोरोना महामारीच्या संकटात सार्वजनिक कार्यक्रम ,सण उत्सव सोहळे रद्द करण्यात आले आहेत. कोरोनाच्या संकटाचा दिवसेंदिवस विस्फोट होत असुन ऑक्सिजनच्या तुटवड्याचा  सामना प्रत्येकाला करावा लागत आहे.

भविष्यातील ऑक्सिजनची गरज ओळखून आज गावात रमजान ईद साधेपणात साजरी करण्यात आली. घरातच नमाज पठण करुन गावात ऑक्सिजनची निर्मिती व्हावी यासाठी झाडांची रोपे गावातील नागरिकांना भेट देण्यात आली. 

सध्या जीवन मरणाची लढाई सुरु आहे.  अशात प्रत्येकजण सामाजिक बांधितली जपत जमेल त्या पद्धतीने मदतीचा हात पुढे करत आहे.  पुढील काळात मात्र नैसर्गिक ऑक्सिजनची निर्मिती करणारे वृक्ष किती महत्वाचे आहेत हे आता जवळपास माणसाच्या लक्षात येऊ लागले आहे.

भविष्यातील ऑक्सिजनची गरज ओळखून कुरुळी गावचे सरपंच अरिफ पठाण यांनी मुस्लिम बांधवांसमवेट रमजान ईद साधेपणात साजरी करुन गावात वृक्ष लागवड व्हावी व त्या झाडांचे जतन करण्याची शपथ घेतली. रमजान इद निमित्त मुस्लिम बांधवांनी हाती घेतलेले सामाजिक दायित्व देशात प्रत्येक नागरिकाला प्रेरणा देणारे आहे. 

Edited By : Krushna Sathe  
 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com