प्रणिती शिंदेंना सोलापूरचे पालकमंत्री करा; भाजप नगरसेवकाची मागणी

विश्वभूषण लिमये
रविवार, 25 एप्रिल 2021

भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील हे पालकमंत्र्यांचा निषेध करण्यासाठी काळे कपडे, काळी टोपी परिधान करून नियोजन भवन येथे आले होते. तर काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांची पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी भाजपच्या नगरसेवकाने केली. 

सोलापूर : सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे Dattatray Bharne मागील तीन दिवसांपासून सोलापूर Solapur जिल्हा दौऱ्यावर आहेत. दोन दिवस ग्रामीण भागाचा आढावा घेतल्यानंतर शहरातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज बैठक आयोजित करण्यात आली आहे. मात्र या बैठकीवर आंदोलनाचे सावट दिसून येत आहे. दरम्यान, प्रणिती शिंदे Praniti Shindeयांची सोलापूरच्या पालकमंत्रीपदावर Guardian Minister नियुक्ती करावी, अशी अजब मागणी भाजपने केली आहे. Solapur BJP Demands to appoint Praniti Shinde as Guardian Minister

जिल्ह्यातील ऑक्सिजन आणि रेमेडीसिविरचा तुटवडा पाहता भाजपचे काही कार्यकर्ते आंदोलनाच्या तयारीत होते. मात्र पोलिसांना याची चुणूक लागताच नियोजन भवन बाहेर कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. निवेदन देण्यास येणाऱ्या नागरिकांची पोलिसांनी कसून तपासणी केली. तर काळे कपडे परिधान करून येणाऱ्या भाजपच्या BJP नगरसेवकांचे प्रवेश देखील पोलिसांनी रोखले. Solapur BJP Demands to appoint Praniti Shinde as Guardian Minister

भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील हे पालकमंत्र्यांचा निषेध करण्यासाठी काळे कपडे, काळी टोपी परिधान करून नियोजन भवन येथे आले होते. तर काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांची पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी भाजपच्या नगरसेवकाने केली. 

सोलापुरात बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना औषधांचा तुटवडा आहे. मात्र, पुण्यात Pune सर्व औषधे मिळतात. सोलापूरसाठी आतापर्यंत तीन पालकमंत्री नियुक्त करण्यात आले. मात्र हे सर्व पालकमंत्री बिनकामाचे असून सोलापुरातील आमदारांची पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात यावी, सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे यांची नियुक्ती पालकमंत्री म्हणून करण्यात यावी अशी मागणी भाजपचे नगरसेवक सुरेश पाटील यांनी केली. Solapur BJP Demands to appoint Praniti Shinde as Guardian Minister

दरम्यान पत्रकारांनाही नियोजन भवन मध्ये प्रवेश देत असताना कसून तपासणी करण्यात आली, पत्रकारांचे खिसे सुद्धा यावेळी पोलिसांकडून तपासण्यात आल्याचं पहायला मिळालं. 
Edited By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live