सोलापूर-उजनीच्या पाण्यावरून दत्तात्रेय भरणे झाले आक्रमक

विश्वभूषण लिमये
रविवार, 25 एप्रिल 2021

उजनी धरणातून ५ टीएमसी पाणी इंदापुरला पळवल्याचा आरोप सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्यावर गेली दोन दिवस केला जातोय. यावर आज सोलापूरच्या पत्रकार परिषदेत पालकमंत्री भरणे आक्रमक झाले.

सोलापूर : उजनी Ujani DAN धरणातून ५ टीएमसी TMC पाणी इंदापुरला पळवल्याचा आरोप सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्यावर गेली दोन दिवस केला जातोय. यावर आज सोलापूरच्या पत्रकार परिषदेत पालकमंत्री भरणे आक्रमक झाले. या पाण्यावरून राजकारण केलं जातंय. हे मोठं षडयंत्र आहे.मात्र सोलापूरचे एक थेंब पाणी जरी कमी झाल्याचे सिद्ध झाल्यास मंत्रीपद,आमदारकी सोडा राजकारणातून संन्यास घेईन, असे थेट आव्हान त्यांनी विरोधकांना दिलंय. Solapur Guardian Minister Dattatray Bharne Aggrestive over Ujani Water

काही दिवसांपूर्वी उजणीतून इंदापूरला Indapur ५ टी एम सी पाणी पालकमंत्री दत्तात्रेय भरणे Dattatray Bharne यांनी पळवल्याचा आरोप केला जातोय. यावर भावूक होऊन भरणे यांनी आपली भूमिका मांडली. इंदापूर माझा तालुका आहे. मात्र मला भाकरी मिळावी म्हणून दुसऱ्याची भाकरी पाळवण्याचे माझे संस्कार नाहीत. त्यामुळे सोलापूरकरांनी काळजी करू नये असे आश्वासन त्यांनी दिल. 

सोलापूर Solapur शहर आणि ग्रामीण भागातील कोरोनाचा Corona प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. सर्वांनी सहकार्य करावे. अडचणीचा काळ आहे. अशावेळी राजकारण नको मिळून कोरोनावर मात करूया. ऑक्सिजन, लसीकरण , रेमाडीसीवीर इंजेक्शन साठी आम्ही प्रयत्न करतोय. Solapur Guardian Minister Dattatray Bharne Aggrestive over Ujani Water

ऑक्सिजन साठी तर उस्मानाबाद आणि सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांमध्ये शालेय विद्यार्थ्यांप्रमाणे भांडण झाले. प्रशासकीय अधिकारी जीव तोडून काम करताहेत. त्यामुळे सर्वांनी सहकार्य करा असे आवाहन त्यांनी केलं.
 


संबंधित बातम्या

Saam TV Live