सोलापुरात कोरोना जनजागृतीसाठी 'हनुमान' अवतरले रस्त्यावर

Saam Banner Template (4).jpg
Saam Banner Template (4).jpg

सोलापूर शहरातील (Solapur City) कोरोना रुग्णांची (Coronavirus) संख्या घटल्याने शहरात शासन नियमांच्या लेव्हल दोन नुसार सर्व आस्थापना सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, याचा विसर नागरिकांना पडलेला पहायला मिळतं आहे. सोलापुरात सार्वजनिक ठिकाणी नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करताना आढळून येतात, त्यामुळे या बेफिकीर नागरिकांची जनजागृती करण्यासाठी थेट पवनपुत्र हनुमानाचं रस्त्यावर अवतरले आहेत.  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनाच अवचित्य साधून आज राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि महाबली हनुमान हे सोलापूर शहरातील नागरिकांना कोरोना जनजागृतीबद्दल प्रबोधन करत आहेत. रस्त्यावर फिरणाऱ्या प्रत्येक नागरिकास मास्क आणि सॅनिटायझरच वाटप हनुमान करत असताना दिसतं आहेत.  

हे देखील पाहा 

सोलापुरातील नागरिकांना शहरातील पुन्हा लॉकडाऊन नको असेल तर किमान देवाचं ऐकून तरी सोलापूरकर सुधारतील या आशेवर हा उपक्रम आज दिवसभर सुरु आहे. (In Solapur, 'Hanuman' took to the streets for corona awareness)

दरम्यान, राज्यात ५ टप्प्यामध्ये अनलॉक होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर दुसऱ्या टप्प्यात असलेल्या सोलापूरमध्ये अनलॉक झालेला आहे. राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे रुग्ण कमी होताना दिसत आहेत. त्याचबरोबर तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता रुग्ण वाढू नये म्हणून उपाययोजना सरकारद्वारे करण्यात येत आहेत. लोकांना सरकारच्या आवाहनाचा काहीच फरक पडताना दिसत नाहीये. त्याच पार्श्वभूमीवर सोलापुरात चक्क हनुमान अवतरले आहेत.   

Edited By : Pravin Dhamale

ताज्या बातम्यासाठी भेट द्या
Website - https://www.saamtv.com/
Twitter - https://twitter.com/saamTVnews
Facebook- https://www.facebook.com/SaamTV
ताज्या व्हिडिओंसाठी पहा
युट्यूब - https://www.youtube.com/channel/UC6cxTsUnfSZrj96KNHhRTHQ
टेलिग्राम - https://t.me/SaamNews

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com