बीडच्या आश्रमशाळेत गैरव्यवहार,पोषण आहाराचं साहित्य विकलं काळ्याबाजारात

साम टीव्ही
सोमवार, 21 डिसेंबर 2020
  • बीडच्या आश्रमशाळेत गैरव्यवहार
  • पोषण आहाराचं साहित्य विकलं काळ्याबाजारात
  • 237 बोगस विद्यार्थी दाखवून भ्रष्टाचार
     

चुकीची विद्यार्थी संख्या आणि बोगस आधार नंबर दाखवून एका आश्रम शाळेने शासनाला लाखोंचा गंडा घातलाय. विशेष म्हणजे आश्रम शाळेचं हे बोगस विदयार्थी रॅकेट इथल्या शिक्षकांनीच उघड केलंय.पाहुयात त्याबाबतचा खास रिपोर्ट..

बीडच्या पाटोदा तालुक्यातल्या डोंगर पट्ट्यातल्या उसतोड कामगारांच्या मुलांसाठीची ही संत शिरोमणी भगवान बाबा प्राथमिक निवासी आश्रमशाळा..या आश्रमशाळेत एक दोन नव्हे तर तब्बल 237 बोगस विद्यार्थी दाखवून शासकीय योजनेचा गैरफायदा घेतल्याची धक्कादायक बाब उघड झालीय.  शालेय पोषण आहाराचं साहित्य काळ्याबाजारात तर पुस्तकं आणि शैक्षणिक साहित्य रद्दीत विकलं जातं.

त्यापेक्षाही गंभीर बाब म्हणजे या भ्रष्टाचाराला साथ न देणाऱ्या शिक्षकांचे गेल्या आठ महिन्यापासून संस्था चालकांनी पगारच केलेले नाहीत. शिवाय अशा शिक्षकांना खोट्या नोटीस पाठवून, त्यांना निलंबित करण्याच्या धमक्या दिल्या जातायत. 

धक्कादायक बाब म्हणजे कोरोनाच्या काळात शाळा बंद असल्याने, काही शिक्षकांना संस्थाचालकांनी थेट बांधकामावर पाणी मारण्यासाठी पाठवल्याची बाबही समोर आलीय. 

संस्थाचालक प्रत्येक शिक्षकाकडून वर्षाला दोन पगार मागून घेतो.नाही दिले तर वर्षभराचे पगार काढत नाही.
आता या भ्रष्टाचाराची दखल घेत संबंधित विभाग अशा बोगस संस्थांवर कारवाई करणार का? हा खरा प्रश्न आहे.


संबंधित बातम्या

Saam TV Live