कॉंग्रेसचे काही आमदार करणार भाजपमध्ये प्रवेश

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

मुंबई - विधानसभा निवडणुकीचे अर्ज भरण्यास सुरवात झाली असतानाही भाजपमध्ये मेगा भरती कमी झालेली नाही. आज भाजपमध्ये काँग्रेसचे काही विद्यमान आमदार प्रवेश करणार असल्याचे भाजपकडून सांगण्यात येते. 

मुंबई - विधानसभा निवडणुकीचे अर्ज भरण्यास सुरवात झाली असतानाही भाजपमध्ये मेगा भरती कमी झालेली नाही. आज भाजपमध्ये काँग्रेसचे काही विद्यमान आमदार प्रवेश करणार असल्याचे भाजपकडून सांगण्यात येते. 

यामध्ये विदर्भातील चिखली मतदारसंघाचे काँग्रेसचे विद्यमान आमदार राहुल बोंद्रे, मुंबईतील मालाडचे आमदार अस्लम शेख, आमदार भारत भालके, आमदार डी. एस. अहिरे, सिद्राम म्हेत्रे, माजी आमदार काशिराम पावरा आदी प्रवेश करणार असल्याचे समजते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार असल्याचे सांगण्यात येते.

Web Title: Some existing Congress MLAs will enter the BJP
 
संबंधित बातम्या

Saam TV Live