पोटच्या मुलानेच केला आईवर अत्याचार; नात्याला काळिमा फासणारी घटना

संजय जाधव
रविवार, 6 जून 2021

विशेष म्हणजे या नराधमाला मुलगा, मुलगी असून मुलीचे लग्न सुद्धा झाले आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील एका पोलिस स्टेशन अंतर्गत येणा-या गाावात  हमाली काम करणा-या 45 वर्षीय सुनिलने (बदललेले नाव) आपल्या ६५ वर्षीय आईवरच अत्याचार केला. पत्नी माहेरी गेली असल्याने आई एकटीच घरी असल्याचा फायदा घेत या नराधमाने हे घृणास्पद कृत्य केले. रविवारी सकाळी आईने संबंधित पोलिस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली आहे. या घटनेची वार्ता गाव परिसरात पसरल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.(The son abused the mother; Incidents that discredit the relationship)

विशेष म्हणजे या नराधमाला मुलगा, मुलगी असून मुलीचे लग्न सुद्धा झाले आहे. बरेच दिवसापासून तो दारुच्या नशेत पत्नीस व आईस मारहाण करीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनेनंतर आरोपी मुलगा फरार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश बरकते यांनी तत्काळ आरोपीला ताब्यात घेण्याची सुचना ठाणेदारास दिली.

हे देखील पाहा

मात्र तोपर्यंत आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला आहे. आरोपिला पकडण्यासाठी पोलिसांचं एक पथक नेमण्यात आले असून पथक आरोपिचा शोध घेत आहे. 

 Edited By ; Pravin Dhamale

ताज्या बातम्यासाठी भेट द्या
Website - https://www.saamtv.com/
Twitter - https://twitter.com/saamTVnews
Facebook- https://www.facebook.com/SaamTV
ताज्या व्हिडिओंसाठी पहा
युट्यूब - https://www.youtube.com/channel/UC6cxTsUnfSZrj96KNHhRTHQ
टेलिग्राम - https://t.me/SaamNews


संबंधित बातम्या

Saam TV Live