लोकलसेवा सुरू होताच बेस्टला फटका तसेच उत्पन्नवाढीची बेस्टला पुन्हा चिंता ....

SAAM TV
गुरुवार, 11 फेब्रुवारी 2021

लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्यांसाठी बंद असलेली लोकलसेवा 1 फेब्रुवारीपासून सुरू झालीय. लोकलसेवा सुरू होताच मेट्रोच्या प्रवासी संख्येतही वाढ झालीय. मात्र त्याचा दुसरा परिणाम बेस्टच्या प्रवासी संख्येवर झालाय.

लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्यांसाठी बंद असलेली लोकलसेवा 1 फेब्रुवारीपासून सुरू झालीय. लोकलसेवा सुरू होताच मेट्रोच्या प्रवासी संख्येतही वाढ झालीय. मात्र त्याचा दुसरा परिणाम बेस्टच्या प्रवासी संख्येवर झालाय. 

मार्च 2020 मध्ये मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर मुंबईची लाईफलाईन अर्थात लोकलसेवा ठप्प झाली. जूनमध्ये मिशन बिगीन अगेनचा पहिला टप्पा सुरू होताच मुंबईकरांना आधार होता तो बेस्टचाच...नुकसानीत धावणाऱ्या बेस्टलाही म्हणता म्हणता 17 लाख प्रवासी मिळाले. जानेवारी अखेरपर्यंत हा आकडा 28 लाखांपर्यंत पोहचला होता. आता मुंबईतले जवळजवळ सर्वच व्यवहार पूर्वपदावर आलेत. 1 फेब्रुवारीपासून लोकलची दारं सर्वसामान्य मुंबईकरांसाठीही खुली झालीयेत. मात्र याचा परिणाम बेस्टच्या प्रवासी संख्येवर झालाय. बेस्टच्या प्रवासी संख्येत घट झालीय. तर दुसरीकडे मेट्रोच्या प्रवासी संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झालीय. 

29 जानेवारीपर्यंत बेस्ट उपक्रमामार्फत 4 हजार 201 बसगाड्या चालवण्यात आल्या. या बसगाड्यांमधून 26 लाख प्रवाशआंनी प्रवास केला. तर 5 फेब्रुवारीला 4 हजार 138 बसगाड्यांमधून 25 लाख प्रवाशांनी प्रवास केला. मेट्रोचा विचार केला तर 19 ऑक्टोबरपासून मेट्रोसेवेला सुरूवात झाली. आजच्या घडीला मेट्रोच्या प्रवाशांची संख्या 1 लाखांपर्यंत पोहचलीय. मेट्रोच्या फेऱ्यांची संख्या 240 वरून 256 इतकी करण्यात आलीय. 

 लोकलसेवा ही मुंबईची लाईफलाईन मानली जाते.  मुंबईकरांसाठी तब्बल 10 महिने लोकलसेवा बंद होती. मात्र 1 फेब्रुवारीनंतर सामान्य मुंबईकर पुन्हा लोकलने प्रवास करू लागलेत. त्याचा फायदा रेल्वेला होताना दिसतोय. 

 याआधी घरापासून कार्यालयापर्यंत जाण्यासाठी अनेकांनी बेस्टचाच पर्याय निवडला होता. मात्र आता प्रवासी पुन्हा लोकल आणि मेट्रोकडे वळू लागलेत. त्यामुळे स्वाभाविकच बेस्टच्या प्रवासी संख्येत घट होतीय. त्याचा परिणाम बेस्ट प्रशासनाच्या उत्पन्नावरही होणारंय. 

 


फोटो

संबंधित बातम्या

Saam TV Live