दक्षिण मुंबई भाजपला, तर ईशान्य मुंबई शिवसेनेला?

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 20 फेब्रुवारी 2019

मुंबई - जैन, मारवाडी आणि गुजराती समाजाची वस्ती असलेला दक्षिण मुंबई मतदारसंघ भाजपने लढवावा, तर ईशान्य मुंबईतले वाद लक्षात घेता तो शिवसेनेने आपल्याकडे घ्यावा, असा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. प्रारंभिक पातळीवर सध्या याबाबत चर्चा सुरू आहे. दक्षिण मुंबईतून शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी गेली पाच वर्षे मतदारसंघात उत्तम संपर्क ठेवला. मात्र, काँग्रेसच्या मिलिंद देवरांचे आव्हान लक्षात घेता ते या वेळी यशस्वी होतील काय याबद्दल शंका आहे. ईशान्य मुंबईचे खासदार किरीट सोमैया यांनी हा भाग अक्षरश: पिंजून काढला आहे.

मुंबई - जैन, मारवाडी आणि गुजराती समाजाची वस्ती असलेला दक्षिण मुंबई मतदारसंघ भाजपने लढवावा, तर ईशान्य मुंबईतले वाद लक्षात घेता तो शिवसेनेने आपल्याकडे घ्यावा, असा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. प्रारंभिक पातळीवर सध्या याबाबत चर्चा सुरू आहे. दक्षिण मुंबईतून शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी गेली पाच वर्षे मतदारसंघात उत्तम संपर्क ठेवला. मात्र, काँग्रेसच्या मिलिंद देवरांचे आव्हान लक्षात घेता ते या वेळी यशस्वी होतील काय याबद्दल शंका आहे. ईशान्य मुंबईचे खासदार किरीट सोमैया यांनी हा भाग अक्षरश: पिंजून काढला आहे. मात्र, शिवसेनेचे त्यांच्याशी उभे भांडण झाल्याने हा मतदारसंघ त्यांना कठीण जाईल असे मानले जाते. दोन्ही मतदारसंघात विद्यमान खासदार असल्याने जागा बदलणे कठीण असल्याचे सांगितले जाते. 

प्रवक्‍त्यांनी बोलावे...
दरम्यान, शिवसेनेने पडते घेत युती केली असल्याची टीका समाजमाध्यमात होत असल्याने आता आपली भूमिका स्पष्ट करा, असे प्रवक्‍त्यांना सांगण्यात आले आहे. आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नीलम गोऱ्हे, मनीषा कायंदे, अनिल परब या प्रवक्‍त्यांशी चर्चा केली. त्यांना अधिक आक्रमकपणे बचाव करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Web Title: South Mumbai BJP and a proposal to the north-east Mumbai Shivsena in election 2019


संबंधित बातम्या

Saam TV Live