अमिताभ यांच्या जेवणासाठी विशेष सोय

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 17 डिसेंबर 2018

नागपूर - "झुंड' चित्रपटाच्या शूटिंगसाठी नागपूरच्या पंचतारांकित रेडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये "बिग बी' अमिताभ बच्चन थांबले आहेत. या हॉटेलच्या जेवणात अळ्या निघाल्याची चर्चा शहरात पसरली. ही माहिती अन्न व औषध प्रशासन कार्यालयातही पोहोचली. बच्चन यांनी रेडिसन ब्ल्यूमध्ये जेवण केल्यास त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होईल, अशीही चर्चा होती. याबाबत झुंडचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, हाती आलेल्या माहितीनुसार बिग बीसह झुंडच्या कलावंतांसाठी जेवणाची स्वतंत्र सोय केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

नागपूर - "झुंड' चित्रपटाच्या शूटिंगसाठी नागपूरच्या पंचतारांकित रेडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये "बिग बी' अमिताभ बच्चन थांबले आहेत. या हॉटेलच्या जेवणात अळ्या निघाल्याची चर्चा शहरात पसरली. ही माहिती अन्न व औषध प्रशासन कार्यालयातही पोहोचली. बच्चन यांनी रेडिसन ब्ल्यूमध्ये जेवण केल्यास त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होईल, अशीही चर्चा होती. याबाबत झुंडचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, हाती आलेल्या माहितीनुसार बिग बीसह झुंडच्या कलावंतांसाठी जेवणाची स्वतंत्र सोय केल्याची माहिती सूत्रांनी दिली. बिग बी हॉटेलमध्ये जेवण काय तर साधे पाणीही पीत नसल्याचे सांगण्यात आले. 

"झुंड' चित्रपटाची शूटिंग नागपूरच्या मोहननगरात सुरू आहे. अमिताभ बच्चन यांची राहण्याची व्यवस्था वर्धा रोड मार्गावरील रेडिसन ब्ल्यू हॉटेलात केली आहे. शनिवारी या हॉटेलच्या जेवणात अळ्या निघाल्या. हॉटेल व्यवस्थापनाकडे याबाबत तक्रार केली होती. त्यांनी पुन्हा असा प्रकार घडणार नसल्याचे सांगितले होते. तरीही दुसऱ्या दिवशी जेवणात अळ्या निघाल्या. अन्न व औषध प्रशासनाकडे याबाबत तक्रार केली. 

लेटलतीफ कार्यालय 
दुपारी तक्रार केल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी सायंकाळी आले. या पथकाने नमुने गोळा करून तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले. नमुने घेण्यासाठी अधिकारी उशिरा का पोहोचले, अशी शंका यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली. 

Web Title: Special arrangements for Amitabh Bachchan food in nagpur


संबंधित बातम्या

Saam TV Live