थर्टी फर्स्टला वाहन चालवताय? मग हे नक्की वाचा  

साम टीव्ही न्यूज
मंगळवार, 24 डिसेंबर 2019

जर तुम्ही थर्टी फर्स्टला  मद्यपान करुन वाहन चालवणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. थर्टी फर्स्टला होणारे अपघात रोखण्यासाठी पोलिंसानी विशेष मोहीम राबवली आहे. 

पुणे : सरत्या वर्षाला निरोप देताना जर तुम्ही  मद्यपान करुन वाहन चालवित स्वतःसह दुसऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्यांविरुद्ध पुणे पोलिसांनी विशेष मोहिम सुरू केली आहे. रविवारपासून शहराच्या वेगवेगळ्या भागातील अंतर्गत व प्रमुख रस्त्यांवर स्थानिक पोलिसांची पथके नाकाबंदी करुन वाहनचालकांची तपासणी करण्यास सुरूवात केली. त्यामध्ये भरधाव वाहन चालविणे, मद्यपान करुन वाहन चालविणे यांसारख्या विविध प्रकारचे गुन्हे करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.  त्याअंतर्गत वाहतुक पोलिसांसह पोलिस ठाण्यांच्या पोलिसांकडून नाकाबंदी करुन तपासणीवर भर देण्यात आला आहे. 

"सर्वोच्च न्यायालयाने अपघातांचे प्रमाण कमी करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यानुसार पुणे पोलिसांनी ठोस उपाययोजना करुन अपघात कमी करण्यात यश मिळविले. परंतु नोव्हेंबरमध्ये पुन्हा अपघात वाढले. 31 डिसेंबरच्या पार्श्‍वभुमीवर अपघाताचे प्रमाण अधिक वाढण्याची शक्‍यता लक्षात घेऊन विशेष मोहिम राबविण्यास सुरूवात केली आहे.

मागील वर्षभरामध्ये अपघात रोखण्यामध्ये पुणे पोलिसांच्या वाहतुक शाखेला यश आलेले असले, तरीही मागील दोन महिन्यामध्ये मात्र ही अपघातांच्या संख्येत वाढ झाल्याची सद्यस्थिती आहे. त्याची पोलिस आयुक्त डॉ.के.वेंकटेशम यांनी गांभीर्याने दखल घेत महत्वाचे निर्णय घेतले. विशेषतः 31 डिसेंबर व एक जानेवारीच्या पार्श्‍वभुमीवर तरुणांकडून मद्यपान करुन भरधाव वाहने चालविण्याचे प्रकार जास्त घडतात. त्यामुळे अपघात होऊन त्यामध्ये संबंधीत वाहनचालकासह सर्वसामान्य नागरीकांच्याही जीवाला धोका निर्माण होतो. अशा वाहनचालकांविरुद्ध पुणे पोलिसांनी मागील वर्षीही विशेष मोहिम राबवून अपघातांवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला होता. त्यादृष्टीने यावेळी एक आठवडा आगोदरच पोलिसांनी विशेष मोहिम राबविण्यास सुरूवात केली आहे. 

Web Title: Special campaign of police against drunk driving on Thirty First


संबंधित बातम्या

Saam TV Live