VIDEO | जगातली पहिली उडणारी कार भारतात बनणार.

,साम टीव्ही
गुरुवार, 19 नोव्हेंबर 2020

जगातली पहिली उडणारी कार भारतात बनणार

नेदरलँडच्या कंपनीचा गुजरात सरकारशी करार

डच कंपनी पाल-व्ही कंपनी भारतात येणार

फ्लाईंग कार्स अर्थात उडणाऱ्या गाड्यांचं माणसाचं स्वप्न काही वर्षात सत्यात अवतरणार आहे. आणि या उडणाऱ्या गाड्या भारतीयांसाठी एका वेगळ्या अर्थानं अभिमानास्पद असणार आहेत. 

अशी असेल फ्लाईंग कार

  • या कारला तीन चाकं असतील
  • केवळ दोघांनाच यात बसण्याची जागा असेल
  • रस्त्यावर या कारचा सर्वाधिक वेग 160किमी प्रतितास इतका असेल
  • हवेत 180किमी प्रतितास इतक्या वेगानं ही कार उडू शकेल
  • ही कार चालवणाऱ्यांना ड्रायव्हिंग लायसन्ससह फ्लाईंग लायसन्सही गरजेचं आहे
  • पायनियर या नावानं ही उडणारी कार विकली जाणार आहे
  • या कारची किंमत 4 कोटी 46 लाख असणार आहे

भविष्यकाळ हा रस्त्यावरील कारसोबत हवेत उडणाऱ्या कार्सचाही असणार आहे आणि जगातली पहिली उडणारी कार भारतात येणार आहे. पाल-व्ही या उडणारी कार बनवणाऱ्या डच कंपनीनं गुजरात सरकारसोबत करार केलाय. 

ही कार गुजरातमध्ये तयार होऊन युरोपात निर्यात होईल. 2021 पर्यंत कारच्या उत्पादनास सुरुवात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जगातली पहिली उडणारी कार तयार होण्याचा मान भारताला मिळणार आहे. हा भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी नक्कीच मैलाचा दगड म्हणावा लागेल

 


संबंधित बातम्या

Saam TV Live