VIDEO | पुण्यातल्या पक्षांची ही अफलातून शाळा पाहाच!

साम टिव्ही
सोमवार, 9 नोव्हेंबर 2020

आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत एक अशी शाळा . जिथं विद्यार्थी नाहीत, शिक्षक नाहीत .  ना फळा, ना पुस्तकं. तर तिथं आहे फक्त चिवचिवाट. पाहूयात पुण्यातली ही अफलातून शाळा कशी आहे.

पुणे :  एक अशी शाळा . जिथं विद्यार्थी नाहीत, शिक्षक नाहीत .  ना फळा, ना पुस्तकं. तर तिथं आहे फक्त चिवचिवाट. पाहूयात पुण्यातली ही अफलातून शाळा कशी आहे.

पाहा या शाळेचा हा व्हिडीओ -

 

 झाडाच्या बुंध्याशी ठेवलेल्या मातीच्या थारोळ्यातील पाण्यात कुलकुलणारा हा पक्षी किती मनमोहक दिसतोय.  किती स्वच्छंदीपणा त्याच्या मनसोक्त डुंबण्यात आहे. पाण्याचे मोत्यासारखे हेलकावणारे नितळ थेंब अंगावर घेणाऱ्या या इवल्याशा जीवाची किती मौज चाललीय. हे ठिकाण आहे पुण्यातील . पद्मावती भागातील.  ही कुठली बाग नाहीय. तर ही आहे नंदू कुलकर्णी यांची गच्ची. त्यांनी गच्चीवर ही पक्ष्यांची शाळा भरवलीय.  तीही तब्बल 30 वर्षांपासून. त्यांनी तिथं पक्ष्यांसाठी शेकडो झाडं, रोपं बहरत ठेवलीयत. त्या रोपा-झाडांवर त्यांनी घरटीही लावलीयत. इतकचं नाही तर त्यांनी पक्ष्यांची तहान भागवण्यासाठी मातीचं छानसं थारोळंही ठेवलंय. गेल्या 30 वर्षांत त्यांच्या या शाळेला सुमारे चाळीसहून अधिक प्रजातीच्या पक्ष्यांनी भेट दिलीय.
पर्यावरण संवर्धन, पाणी बचत, प्रदूषणाबाबत जागरूक असणाऱ्या नंदू कुलकर्णी यांचा पक्ष्यांवर विशेष जिव्हाळा आहे. पक्ष्यांना कसं जपायचं याबाबत ते लोकांना मार्गदर्शन करताना सांगतात.

 


संबंधित बातम्या

Saam TV Live