उद्यापासून  सुरू होणार विशेष ट्रेन

उद्यापासून  सुरू होणार विशेष ट्रेन


 

नवी दिल्लीः  १२ मेपासून रेल्वे १५ पॅसेंजर ट्रेन चालवणार आहे. या पॅसेंजर ट्रेन जोडीने चालवण्यात येतील. (return journeys) यानुसार या ट्रेनच्या एकूण ३० फेऱ्या होतील. या गाड्या डिब्रुगढ, अगरतळा, हावडा, पाटणा, बिलासपूर, रांची, भुवनेश्वर, सिकंदराबाद, बेंगळुरू, चेन्नई, तिरुवनंतपूरम, मडगाव, मुंबई सेंट्रल, अहमबादाबाद आणि जम्मू तवीला जाणाऱ्या आहेत. नवी दिल्लीवरून विशेष ट्रेनच्या स्वरूपात या गाड्या चालवल्या जातील. 

फक्त कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच रेल्वे स्थानकात प्रवेश दिला जाईल, अशी माहिती एएनआय वृत्तसंस्थेने दिलीय. उद्या संध्याकाळपासून रेल्वेचे आरक्षण सुरू होईल. करोना व्हायरसच्या लॉकडाऊनमुळे बंद करण्यात आलेली रेल्वे वाहतूक १२ मेपासून पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. रेल्वे मंत्रालयाने यासाठी नियोजन केले आहे. सुरुवातीला कमी संख्येत रेल्वे गाड्या धावतील. यादरम्यान प्रवाशांची आरोग्य आणि करोना तपासणी केली जाईल. 

 रेल्वेमध्ये फक्त प्रवाशांनाचा चढण्याची परवागनी असेल. याशिवाय रेल्वेने इतर राज्यांमध्ये अडकलेल्या मजुरांसाठी ३०० श्रमिक विशेष ट्रेन चालवण्याची तयारी केली आहे. विशेष रेल्वे गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडे कन्फर्म तिकीट असेल तरच त्यांना रेल्वे स्थानकात प्रवेश देण्यात येणार आहे. प्रवाशांना मास्क बंधनकारक असेल. तसंच प्रवासापूर्वी त्यांचे स्क्रिनिंगही केले जाईल.

सर्व पॅसेंजर ट्रेन या एसी डब्यांच्या असतील. या गाड्यांना मर्यादित थांबे असतील. राजधानी रेल्वेच्या तिकीटाइतकेच तिकीट या गाड्यांसाठी असेल. म्हणजे प्रवाशांना तिकीटासाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत.

 प्रवाशांना तिकीट खिडकीवर बुकींग करता येणार नाही. तर IRCTC च्या वेबसाइटवरून बुकींग करावं लागेलं. (https://www.irctc.co.in/) रेल्वे स्थानकांवरील काउंटर वरून कुठल्याही प्रकारचे तिकीट दिले जाणार नाही. या विशेष ट्रेनसाठी उद्या ११ मेपासून संध्याकाळी ४ वाजेपासून आरक्षण सुरू होणार आहे. 
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com