दिनांक : 12 जून 2021 - असा असेल आजचा दिवस

दिनांक : 12 जून 2021 - असा असेल आजचा दिवस
Daily Rashi Cover

मेष : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. हितशत्रुंवर मात कराल.

वृषभ : उधारी, उसनवारी वसूल होईल. आर्थिक सुयश लाभेल.

मिथुन : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

कर्क : काहींचा धार्मिक कार्याकडे कल राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

सिंह : अनेकांचे सहकार्य लाभेल. नवीन स्नेहसंबंध जुळतील.

कन्या : आरोग्य उत्तम राहील. सार्वजनिक क्षेत्रात मानसन्मान लाभेल.

तुळ : एखादी भाग्यकारक घटना घडेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

वृश्‍चिक : वादविवाद टाळावेत. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.

धनु : दैनंदिन कामे मार्गी लागतील. मनोबल उत्तम राहील.

मकर : खर्चाचे प्रमाण वाढेल. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

कुंभ : महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेवू शकाल. काहींची बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.

मीन : मन आनंदी व आशावादी राहील. नोकरीत उत्तम स्थिती राहील.
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com