दिनांक : 20 मे 2021 - असा असेल आजचा दिवस

दिनांक : 20 मे 2021 - असा असेल आजचा दिवस
Daily Rashi Cover

मेष : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मनोबल व आत्मविश्‍वास उत्तम राहील.

वृषभ : सार्वजनिक क्षेत्रात तुमचा दबदबा राहील. नोकरी, व्यवसायात वाढ करू शकाल.

मिथुन : नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील. मनोबल उत्तम राहील.

कर्क : कौटुंबिक जीवनात स्वास्थ्य व समाधान लाभेल. व्यवसायातील अंदाज अचूक ठरतील.

सिंह : दैनंदिन कामे यशस्वी होतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

कन्या : खर्चाचे प्रमाण वाढेल. विरोधकांवर मात कराल.

तुळ : प्रियजनांचा सहवास लाभेल. संततीचे प्रश्‍न मार्गी लावू शकाल.

वृश्‍चिक : मनोबल उत्तम राहील. शासकीय कामे पार पडतील.

धनु : मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

मकर : खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

कुंभ : जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. भागीदारी व्यवसायातील मतभेद कमी करू शकाल.

मीन : मनोबल कमी राहील. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com