कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी महिलांनी सातबहीणी मातेकडे घातले साकडे

कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी महिलांनी सातबहीणी मातेकडे घातले साकडे
hanuman jayanti

भंडारा : कोरोनामुळे Corona देवाघरी जाण्याची वेळ येऊ नये, म्हणून देवाची दारेच बंद करण्यात आली आहेत. मात्र भंडारा Bhandara जिल्ह्यातील मोहाडी Mohadi येथील महिलांनी कोरोनाचे संकट टाळण्यासाठी आता देवाकडे धाव घेतली आहे. Women have now run to God to avoid the Corona crisis

रामनवमी ते हनुमान जयंती या सात दिवसापासून गावातील महिलांनी भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी येथील सातबहीणी या मातामायेच्या मंदिरात दररोज जावून लिंबाच्या पानाने सातसुहासींची आंघोळ करून तिचा सप्तश्रृंगार करून कोरोनाचे संकट Crisis दूर करण्यासाठी विनवणी करीत आहेत. भंडारा जिल्ह्यातील मोहाडी येथे सातबहीणी मातामायेचे पुरातन मंदीर असून गावात कुणाला गोवर किंवा इतर रोग झाले की, मातामायेला लिंबाचा पाणी नेवून तिची आंघोळ घालण्याची प्रथा आहे.

त्यामुळे गोवर, कांजण्या हा रोग दूर होत असल्याचा येथील नागरीकांचा समज आहे. तेव्हा देशावर असलेले कोरोनाचे संकट हे सातबहीणी मातामाय दूर करेल. यासाठी मोहाडी येथील महिला गेल्या सात दिवसापासून मातामायेची पूजाअर्चा करून विनवणी करीत आहेत. आज कोरोनाचे विघ्न दूर करण्यासाठी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले आहे. Women have now run to God to avoid the Corona crisis

देशावरील करोनाचं संकट अजून टळलेलं नाही. त्यामुळे प्रत्येक देशवासीयाच्या डोक्यावर करोनाची टांगती तलवार आहे. मात्र या कठीण प्रसंगामध्ये पोलीस Police, डॉक्टर, नर्स, सफाई कर्मचार हे त्यांचं कर्तव्य बजावत आहेत. एकही दिवस सुट्टी न घेता ते अहोरात्र जागत आहे. त्यामुळेच मोहाडी येथिल महिला सातबहीणी मातामायेला साकडे घालताना दिसत आहेत, मात्र हा सर्व प्रकार काहींना श्रद्धा  तर काहींना अंधश्रद्धा वाटत आहे.

Edited By- Digambar Jadhav

 
No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com