US Open 2023: वयाच्या १९ व्या वर्षी बनली US Open ची चॅम्पियन! एका झटक्यात २५ कोटी कमावणारी गॉफ आहे तरी कोण?

Coco Gauff: यूएस ओपनचे जेतेपद मिळवणारी गॉफ आहे तरी कोण?
coco gauff
coco gaufftwitter

Who Is Coco Gauff:

यूएस ओपन २०२३ स्पर्धेतील अंतिम सामन्यात दमदार खेळ करत १९ वर्षीय कोको गॉफने जेतेपदाला गवसणी घातली आहे. गॉफने आर्यना सबालेंकाला २-६,६-३,६-२ ने पराभूत करत जेतेपदाला गवसणी घातली आहे.

गॉफचं स्वप्न सत्यात उतरणारा हा क्षण होता. कारण काही वर्षांपूर्वी तिने ही स्पर्धा पाहताना स्टँड्समध्ये बसून चॅम्पियन होण्याचं स्वप्न पाहिलं होतं.

coco gauff
IND vs PAK, Asia Cup 2023: ...म्हणून IND vs PAK सामन्यात श्रेयस अय्यरच्या जागी केएल राहुलला मिळाली संधी; समोर आलं मोठं कारण

रँकिंगमध्ये सहाव्या क्रमांकावर असलेल्या गॉफचा सामना दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या आर्यना सबालेंकासोबत रंगला. गॉफने दाखवून दिलं आहे की, वय हा केवळ आकडाच असतो. या विजयानंतर तिला अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले आहे. हा विजय मिळवताच तिला २५ कोटी रक्कम बक्षीस म्हणून मिळाली आहे. (Latest sports updates)

coco gauff
Ind vs Pak Live Score & Updates: भारत- पाकिस्तान सामन्यात पावसाची तुफान बॅटिंग

कोण आहे गॉफ?

गॉफचा जन्म १३ मार्च २००४ ला झाला. खूप कमी लोकांना माहीत असेल की ती लहान असताना आपल्या आई वडिलांसोबत सेरेना आणि विनस विलियम्सला खेळताना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये हजर राहायची.

वयाच्या ६ व्या वर्षी तिने टेनिस खेळायला सुरुवात केली होती. तिच्या वडिलांबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी जॉर्जिया स्टेट युनिव्हर्सिटी कडून बास्केटबॉल संघाचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर त्यांनी हेल्थ केअर एक्जेक्युटिव म्हणून काम पाहिलं. तर तिच्या आईबद्दल बोलायचं झालं तर, तिची आई शिक्षिका आहे.

यूएस ओपनच्या वेबसाईट नुसार ही स्पर्धा जिंकणाऱ्या खेळाडूंवर कोट्यवधींचा पाऊस पाडला जातो. पुरुष किंवा महिला एकेरी स्पर्धा जिंकणाऱ्या खेळाडूंना प्रत्येकी २५ कोटी रुपये दिले जातात. तर उपविजेत्या खेळाडूला साडे बारा कोटी रुपये दिले जातात.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com