2024, 2028, आणि 2032  च्या ऑलिम्पिकचे 
आयोजन 'या' देशांत होणार
2024, 2028, आणि 2032 च्या ऑलिम्पिकचे आयोजन 'या' देशांत होणारSaam Tv

2024, 2028, आणि 2032 च्या ऑलिम्पिकचे आयोजन 'या' देशांत होणार

फेब्रुवारीमध्ये आयओसीने ब्रिस्बेनला चर्चेचे विशेष अधिकार दिले. या निर्णयामुळे कतार, हंगेरी आणि जर्मनीमधील ऑलिम्पिक अधिका-यांच्या दावेदारी बद्दलच्या योजनेवर पाणी फिरले.

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (IOC) बुधवारी 2032 च्या ऑलिम्पिकचे आयोजन करण्यासाठी ब्रिस्बेनची (Brisbane Austrelia) निवड केली आहे. 2032 च्या ऑलिम्पिकसाठी कोणत्याही शहराने होस्टिंगसाठी निविदा सादर केली नव्हती. 2000 मध्ये सिडनी येथे झालेल्या स्पर्धेनंतर 32 वर्षानंतर ऑलिम्पिक पुन्हा ऑस्ट्रेलियामध्ये होेणार आहे. यापूर्वी 1956 मध्ये मेलबर्न येथे ऑलिम्पिक खेळांचे आयोजन करण्यात आले होते.

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन (Scott Morrison) यांनी 11 मिनिटांच्या व्हिडिओ कॉन्फरंसिंगद्वारे ऑलिम्पिक समितीला संबोधित केल. त्यात ते म्हणाले “ऑस्ट्रेलियामध्ये या खेळांचे सफल आयोजन कसे करावे हे आम्हाला माहित आहे''. ब्रिस्बेन पुर्वी 2028 मध्ये लॅास अँजेलीसमध्ये तर 2024 मध्ये पॅरिसमध्ये ऑलिम्पिक होणार आहे. शुक्रवारी सुरू होणाऱ्या टोकियो गेम्सच्या (Tokyo Olympics) आधी झालेल्या बैठकीत आयओसीच्या सदस्यांनी अधिकृत घोषणा करण्यापुर्वी ऑस्ट्रेलियाच्या वतिने आयोजनाबाबत हिरवा कंदिल देण्यात आला आहे.

2024, 2028, आणि 2032  च्या ऑलिम्पिकचे आयोजन 'या' देशांत होणार
IND vs SL: राहुल द्रविडने विजयानंतर भावनिक भाषण केले; पहा Video

फेब्रुवारीमध्ये आयओसीने ब्रिस्बेनला चर्चेचे विशेष अधिकार दिले आहेत. या निर्णयामुळे कतार, हंगेरी आणि जर्मनीमधील ऑलिम्पिक अधिका-यांच्या दावेदारी बद्दलच्या योजनेवर पाणी फिरले. नवीन बिडींग फार्माटनुसार ब्रिस्बेनला आयोजन करणायचा मान मिळाला आहे. नवीन स्वरूपात, आयओसी संभाव्य दावेदारांशी संपर्क साधते आणि त्यांची बिनविरोध निवड करते. प्रचार अभियानावरचा खर्च कमी करण्यासाठी नाही तर आयओसीला अधिक नियंत्रण मिळावे आणि मतं विकत घेण्याच्या प्रक्रियेला रोखण्यासाठी ही नवीन प्रणाली तयार केली असल्य़ाचे सांगितले जात आहे.

Edited By: Pravin Dhamale

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com