मोठी बातमी! एबी डिव्हिलियर्सची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि दिग्गज क्रिकेटपटू एबी डिविलियर्सने आज एक महत्वाची मोठी घोषणा केली आहे.
मोठी बातमी! एबी डिव्हिलियर्सची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
मोठी बातमी! एबी डिव्हिलियर्सची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणाSaam Tv

वृत्तसंस्था : दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि दिग्गज क्रिकेटपटू एबी डिविलियर्सने AB de Villiers आज एक महत्वाची मोठी घोषणा केली आहे. तो सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे त्याने यावेळी सांगितले आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत ही घोषणा केली आहे.

हे देखील पहा-

डिविलियर्सने सांगितले आहे की हा खूप अविश्वसनीय माझा प्रवास होता, पण मी सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून आता निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. अंगणात मोठ्या भावांसह सामने खेळण्यापासून मी हा खेळ पूर्ण आनंदाने आणि बेलगाम उत्साहाने आतापर्यंत खेळलो आहे.

आता मी ३७ वर्षांचा झालो आहे. त्यात ज्योत आता तितकी तेजस्वीपण जळत नाहीये. डिविलियर्सने मे २०१८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. पण तो आंतरराष्ट्रीय निवृत्तीनंतर जगभरात विविध ठिकाणची लीग स्पर्धांमध्ये खेळताना दिसत होता.

मोठी बातमी! एबी डिव्हिलियर्सची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
Mumbai Fire : मुंबईत पुन्हा अग्नितांडव, Prime Mall ला भीषण आग...(पहा व्हिडिओ)

आता त्याने या सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. तो अखेरचे आयपीएल २०२१ हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून खेळताना दिसून आला होता.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com