Adam Gilchrist: वर्ल्ड इंडेक्सचा अहवाल पाहून गिलख्रिस्ट चक्रावला! सांगितलं कोण आहे खरा श्रीमंत ॲडम गिलख्रिस्ट

Adam Gilchrist Statement: जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंच्या यादीत तो अव्वल स्थानी आहे. आता याबाबत त्याने एक मोठा खुलासा केला आहे.
Adam Gilchrist
Adam Gilchristtwitter

Worlds Richest Cricketers: गेल्या काही दिवसांपासून ऑस्ट्रेलिया संघाचा माजी यष्टिरक्षक फलंदाज ॲडम गिलख्रिस्ट सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे.

चर्चेत असण्याच कारण असं की, एका अहवालात त्याला सचिन, विराट आणि धोनी पेक्षाही श्रीमंत असल्याचं म्हटलं आहे.

जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंच्या यादीत तो अव्वल स्थानी आहे. आता याबाबत त्याने एक मोठा खुलासा केला आहे.

Adam Gilchrist
Ind vs Aus: टेस्ट तर जिंकले मात्र वनडे मालिका जिंकणं कठीण! ऑस्ट्रेलियाचा 'हा' दमदार रेकॉर्ड एकदा पाहाच..

ॲडम गिलख्रिस्टने एक ट्विट केले आहे. ज्यात त्याने स्पष्टपणे म्हटले आहे की, हा अहवाल खोटा आहे. त्याने वर्ल्ड इंडेक्सच्या ट्विटला रिप्लाय करत ही माहिती दिली आहे. वर्ल्ड इंडेक्सने असा दावा केला आहे की, ॲडम गिलख्रिस्टची एकूण संपत्ती ३८० मिलियन डॉलर्स इतकी आहे.(Latest sports updates)

ॲडम गिलख्रिस्ट हा ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू आहे. त्याने ट्विट करत असे म्हटले आहे की, ३८० मिलियन डॉलर्सची संपत्ती असलेला ॲडम गिलख्रिस्ट दुसराच कोणीतरी आहे.

ज्या ॲडम गिलख्रिस्टचा यात उल्लेख करण्यात आला आहे, तो एफ ४५ फिटनेस जिमचा मालक आहे. त्याच्या जगभरात अनेक जिम आहेत.

आता ॲडम गिलख्रिस्टच्या खुलास्यानंतर स्पष्ट झालं आहे की,सचिन सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू आहे. सचिनची एकूण संपत्ती १७० मिलियन डॉलर्स इतकी आहे. तर ११५ मिलियन डॉलर संपत्ती असलेला एमएस धोनी दुसऱ्या स्थानी आहे.

जगातील ५ सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू..

सचिन तेंडुलकर -१७० मिलियन डॉलर्स

एमएस धोनी - ११५ मिलियन डॉलर्स

विराट कोहली - ११२ मिलियन डॉलर्स

रिकी पाँटिंग -७५ मिलियन डॉलर्स

जॅक कॅलिस -७० मिलियन डॉलर्स

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com