
Adidas Indian Cricket Team New Kit Sponsor : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) मोठी घोषणा केली आहे. भारतीय क्रिकेट संघाची (Team India) नवी किट स्पॉन्सर आदिदास असेल. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी सोमवारी ट्विटद्वारे ही माहिती दिली.
बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी सोमवारी ट्विट केले. भारतीय संघाची नवी किट स्पॉन्सर कंपनी ही आदिदास असेल, असे त्यांनी सांगितले. सध्या भारतीय खेळाडू आयपीएल २०२३ मध्ये आपापल्या फ्रँचाइजी संघांच्या जर्सीमध्ये दिसत आहेत. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (WTC) अंतिम लढतीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडिया नव्या जर्सीमध्ये दिसू शकतात. (Latest sports updates)
बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी ट्विटमध्ये म्हटले की, किट स्पॉन्सर म्हणून बीसीसीआयने आदिदास कंपनीसोबत करार केला आहे, हे सांगताना मला खूप आनंद होत आहे. आम्ही क्रिकेटला पुढे नेण्यासाठी कटिबद्ध आहोत. जगातील सर्वात मोठ्या स्पोर्ट्सविअर कंपनीसोबत करार करून आम्ही खूप खूश आहोत.
आता भारतीय खेळाडूंच्या जर्सीवर आदिदासचा लोगो दिसणार आहे. बीसीसीआयचा आदिदाससोबतचा हा करार जून २०२३ पासून पुढच्या पाच वर्षांपर्यंतचा असेल. बीसीसीआय गेल्या काही वर्षांपासून ठराविक कालावधीत किट स्पॉन्सर बदलत आहे. २०२० मध्ये नाइकीसोबतचा करार संपुष्टात आल्यानंतर BYJUS आणि MPL सारख्या कंपन्याही स्पॉन्सर होत्या.
एमपीएलचा बीसीसीआयसोबतचा करार २०२३ च्या अखेरपर्यंत होता. मात्र, त्याआधीच हा करार रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर किलर ही कंपनी भारतीय क्रिकेट संघाची स्पॉन्सर होती. किलरसोबत बीसीसीआयने पाच महिन्यांचा करार केला होता.
आयपीएल स्पर्धेनंतर लगेच भारतीय क्रिकेट संघ सर्वात आधी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन दिग्गज संघांत ही फायनल होणार आहे. ७ ते ११ जून दरम्यान लंडनच्या द ओव्हल मैदानावर हा ऐतिहासिक सामना होईल. त्यानंतर आशिया चषक आणि वनडे वर्ल्डकप स्पर्धा होणार आहे. वर्ल्डकप स्पर्धा यावर्षी भारतात होणार आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.