Team India New Jersey: वानखेडेवर झळकली टीम इंडियाची नवी जर्सी! अनावरण सोहळ्याचे अन् नव्या जर्सीचे फोटो पाहाच - VIDEO

Team India Jersey Launch: नुकताच आदिदासने भारतीय संघाची नवीन जर्सी लाँच केली आहे.
team india jersey
team india jerseytwitter

Adidas Jersey: भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ लवकरच आमने सामने येणार आहेत. या दोन्ही संघांमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. हा सामना ७ ते ११ जून दरम्यान इंग्लंडमधील ओव्हलच्या मैदानावर रंगणार आहे.

या सामन्यासाठी भारतीय संघातील खेळाडू जोरदार सराव करताना दिसून येत आहेत. या सामन्यात भारतीय संघातील खेळाडू नव्या जर्सीमध्ये खेळताना दिसून येणार आहेत.

team india jersey
WTC Final 2023: ऑस्ट्रेलियाच्या ताफ्यात भितीचं वातावरण! एकतर्फी सामना फिरवणारा स्टार फलंदाज ठरू शकतो धोक्याची घंटा

नुकताच आदिदासने (Adidas Jersey Launch) भारतीय संघाची नवीन जर्सी लाँच केली आहे. ज्याचा व्हिडिओ आदिदास इंडियाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होऊ लागला आहे.

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, आदिदासने वनडे, टी -२० आणि कसोटी फॉरमॅटसाठी लाँच केली आहे. हा व्हिडीओ वानखेडे स्टेडियमवरील आहे. ड्रोनच्या साहाय्याने ही जर्सी हवेत लटकवली गेली होती. मुंबई लोकलमधून प्रवास करणाऱ्यांनी देखील या जर्सी लाँचचे व्हिडिओ ट्रेनमधून शूट करत शेअर केले होते. (Latest sports updates)

team india jersey
WTC Final 2023: ऑस्ट्रेलियाला हरवण्यासाठी टीम इंडियाचा मास्टरप्लॅन! या प्लेइंग ११ सह उतरणार मैदानात; रोहितचा जिगरी संघाबाहेर

तसेच जर्सी बद्दल बोलायचं झालं तर, वनडे फॉरमॅटची जर्सी ही निळ्या रंगाची आहे. ज्यावर आदिदासचा लोगो आहे. तसेच आदिदासची खरी ओळख म्हणून खांद्यावर पांढऱ्या रंगाच्या ३ आडव्या पट्ट्या आहेत.

टी -२० फॉरमॅटसाठी तयार करण्यात आलेल्या जर्सीबद्दल बोलायचं झालं तर, ही जर्सी गडद निळ्या रंगाची आहे. तर कसोटी फॉरमॅटसाठी पांढऱ्या रंगाची जर्सी लाँच करण्यात आली आहे. आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय खेळाडू ही जर्सी घालून मैदानात उतरणार आहे.

एमपीएलचा बीसीसीआयसोबतचा करार २०२३ च्या अखेरपर्यंत होता. मात्र, त्याआधीच हा करार रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर किलर ही कंपनी भारतीय क्रिकेट संघाची स्पॉन्सर होती. किलरसोबत बीसीसीआयने पाच महिन्यांचा करार केला होता. आता बीसीसीआयने आदिदास कंपनी सोबत करार केला आहे.

यासाठी आदिदासला प्रत्येक सामन्यासाठी बीसीसीआयला ७५ लाख रुपये द्यावे लागणार आहेत. भारतीय वरिष्ठ संघासह, महिला आणि अंडर -१९ संघाची जर्सी देखील आदिदास बनवणार आहे.

आदिदास जर्सीसह टोपी आणि इतर गोष्टी देखील विकणार आहे. यासाठी आदिदास बीसीसीआयला दरवर्षी १० कोटी रुपये देणार आहे. आदिदास सोबतचा हा करार २०२८ पर्यंत असणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com