जय महाराष्ट्र! आदिती स्वामीस राष्ट्रीय धनुर्विद्येत राैप्य

राष्ट्रीय स्पर्धेत देखील दाेघींनी उत्तम कामगिरी केल्याने साता-यातील क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
aditi gopichand swami
aditi gopichand swami

सातारा : अमरावती येथे सुरु असलेल्या ३८ व्या NTPC राष्ट्रीय सबज्युनियर मुलांच्या आणि मुलींच्या धनुर्विद्या (archery) अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या (satara) आदिती गाेपीचंद स्वामी हिने कंपाऊंडमध्ये ६९६ गुण प्राप्त करीत राैप्यपदक पटकाविले. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या (maharashtra) ऋतुजा (६९३) आणि सानिका विजय माेरे (६८१) या अनुक्रमे चाैथ्या आणि सहाव्या स्थानावर राहिल्या.

aditi gopichand swami
राजकारणात संधी मिळत नसते, ती हिसकावून घ्यावी लागते : शरद पवार

आज झालेल्या ५० मीटर अंतरावरील कंपाऊड क्रीडा प्रकारात आदिती स्वामीने ६९६ गुण प्राप्त केले. या स्पर्धेत पंजाबच्या प्रणीत काैरने ६९७ गुण मिळवत सुवर्णपदक पटकाविले तर राजस्थानच्या जी. प्रियाने ६९३ गुण मिळवून कास्यपदकाची कमाई केली. ही स्पर्धा ३० नोव्हेंबर पर्यंत चालणार आहे अशी माहिती भारतीय धनुर्विद्या संघटनेचे सचिव प्रमोद चांदुरकर यांनी दिली.

दरम्यान साता-याची असलेल्या आदिती स्वामीची महाराष्ट्र धनुर्विद्या संघटना, बुलढाणा आर्चरी असोसिएशन व शिवबा आर्चरी अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने बुलढाणा येथे नुकत्याच झालेल्या १९ व्या राज्यस्तरीय सबज्युनियर धनुर्विद्या स्पर्धेत तीन सुवर्ण व एक रौप्यपदक मिळविले हाेते. तसेच सांघिक कंपाउंड राउंडमध्ये सानिका मोरे हिने सुवर्णपदक प्राप्त केले हाेते. या कामगिरीच्या जाेरावर दाेघींची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली हाेती. राष्ट्रीय स्पर्धेत देखील दाेघींनी उत्तम कामगिरी केल्याने साता-यातील क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com