MRF MoGrip FMSCI इंडियन नॅशनल रॅलीत तनिका शानभाग द्वितीय

मी रॅलीचा पुरेपूर आनंद घेतल्याचे साता-याच्या तनिका शानभागने नमूद केले.
MRF MoGrip FMSCI इंडियन नॅशनल रॅलीत तनिका शानभाग द्वितीय
Tanika Shanbhag

पुत्तूर (मंगळुरु) : साताऱ्याच्या तनिका शानभाग हिने एफआयएम विश्वकरंडक विजेत्या ऐश्वर्या पिसे विरुद्ध उत्तम लढत दिली परंतु अपाची आरटीआर चालविणाऱ्या बंगळुरूच्या ऐश्वर्याने रॅली डी मंगळुरूमध्ये सलग तिसऱ्या विजयाची नाेंद केली. दुचाकी वाहनांसाठी असलेली MRF MoGrip FMSCI इंडियन नॅशनल रॅली चॅम्पियनशिप नुकतीच झाली. यात ऐश्वर्याने ५० मिनिटे ३८.८४९ सेकंद अशी वेळ नाेंदवित प्रथम क्रमांक पटकाविला.

Hero Xpulse 200 चालवणारी तनिका शानभागने हिरो Honda Karizma चालविणा-या अनम हाशिमला मागे टाकत द्वितीय स्थानावर शिक्कामाेर्तब केला. तनिकाने ५१ मिनिटे ३२.१८२ सेकंद अशी वेळ नोंदवली तर अनमने एक तास, ९ मिनिटे ०७.७२० सेकंद अशी वेळ नाेंदवली.

Tanika Shanbhag Bagged Second Place In MRF MoGrip FMSCI Indian National Rally Championship (INRC) 2021

Tanika Shanbhag
नाद खूळा! कस्तुरी सावेकरने माऊंट मनस्लूवर फडकवला तिरंगा

एस इव्हेंट्सद्वारे आयोजित रॅली डी मंगळुरूमध्ये दोन विशेष टप्पे होते. करंबी (5.2-किमीचा) डर्ट स्टेज आणि करिकाला (निसरडा 15.1-किमी) लांब टप्पा. दोन्ही टप्पे तीन वेळा आळीपाळीने घेतले गेले. रात्रभर पडणाऱ्या पावसाने रस्ते चिखलमय झाले हाेते. रायडर्सना तांत्रिक आव्हानांना सामोरे जावे लागले.

तनिका आणि ऐश्वर्याने राेमांचकारी अशी राईड केली. सहापैकी तीन विशेष टप्पे जिंकले. ऐश्वर्याने निसरड्या भागात नुकसान टाळण्यासाठी चतुराईने वेग नियंत्रित केला. तर बेंगळुरू रॅलीमध्ये घोट्याला दुखापत झालेल्या तनिकाला त्यावेळी थांबावे लागले हाेते. ताे अनुभव गाठीशी असल्याने तिने यावेळेस जास्त धोका पत्करला नाही असे स्पष्ट केले. ती म्हणाली मी बाईक साफ करण्यासाठी थांबले आणि जिथे मी ३० सेकंदांपेक्षा अधिक वेळ गमावला. पण मी रॅलीचा पुरेपूर आनंद घेतल्याचे नमूद केले.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com