पटेलने पुर्ण संघ गारद केला अन् कुंबळे, लीनच्या पंक्तीत जाऊन बसला

पटेल हा तिसरा असा खेळाडू ठरला आहे ज्याने एका डावात 10 बळी घेतले आहेत.
पटेलने पुर्ण संघ गारद केला अन् कुंबळे, लीनच्या पंक्तीत जाऊन बसला
पटेलने पुर्ण संघ गारद केला अन् कुंबळे, लीनच्या पंक्तीत जाऊन बसलाTwitter

भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात मुंबईत दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना खेळला जात आहे. नाणेफेक जिंकून फलंदाजी करताना भारताने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 4 गडी गमावून 221 धावा केल्या होत्या. आज दुसऱ्या दिवसात भारताचा 325 धावांमध्ये आटोपला आहे. न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेलने (Ajaz Patel) 10 विकेट्स घेत इतिहास रचला आहे. या अगोदर भारताच्या अनिल कुंबळे यांनी असा विक्रम केला होती. पटेल हा तिसरा असा खेळाडू ठरला आहे ज्याने एका डावात 10 बळी घेतले आहेत.

पटेलने पुर्ण संघ गारद केला अन् कुंबळे, लीनच्या पंक्तीत जाऊन बसला
Pune: चोरीसाठी अनेक अंडरवेअरचा वापर; 38 मोबाईल चोरणारा गजाआड

भारताने दुसऱ्या दिवशी 221 धावांच्या पुढे खेळायला सुरुवात केली आणि संघाला लागोपाठ दोन धक्के बसले. एजाज पटेलने साहाला 27 धावांवर एलबीडब्ल्यू केले, त्यानंतर पुढच्याच चेंडूवर आर अश्विन क्लीन बोल्ड झाला. सुरुवातीच्या धक्क्यातून सावरत भारताने उपाहारापर्यंत एकही बळी गमावला नाही. मयंक अगरवालने आपल्या 150 धावा तर अक्षर पटेलने 52 धावा करत भारताचा धावफलक 300 च्या पार नेला. अक्षर पटेलने जबाबदारीने फलंदाजी करत आपले पहिले कसोटी अर्धशतक पूर्ण केले. 113 चेंडूंचा सामना केल्यानंतर या खेळाडूने 5 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केले.

मुंबई कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. शुभमन गिलने मयंकसोबत 80 धावांची भागीदारी केली. यानंतर गिल 44 धावा करून बाद झाला, त्यानंतर पुजारा खातेही न उघडता परतला. एका वादग्रस्त निर्णयामुळे कर्णधार कोहली शून्यावर बाद झाला. यानंतर मयंकने शतक झळकावले, त्याला यष्टिरक्षक वृद्धिमान साहाने साथ दिली.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com