BCCI Central Contracts: मराठमोळ्या अजिंक्य रहाणे अन् भुवनेश्वरला BCCI चा धक्का! आता निवृत्ती घेणार?

Ajinkya Rahane And Bhuvneshwar Kumar: भारतीय संघातील काही दिग्गज खेळाडूंना या कॉन्ट्रॅकमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
Ajinkya Rahane and Bhuvneshwar kumar
Ajinkya Rahane and Bhuvneshwar kumar saam tv

BCCI Central Contracts 2023: रविवारी बीसीसीआयने टीम इंडियाचे वार्षिक कॉन्ट्रॅक जाहीर केले आहेत. यापूर्वी ए प्लस श्रेणीत जसप्रीत बुमराह, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा समावेश होता.

आता या यादीत अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाची भर पडली आहे. तसेच भारतीय संघातील काही दिग्गज खेळाडूंना या कॉन्ट्रॅकमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

त्यामुळे हे खेळाडू आता निवृत्ती घेणार का? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

Ajinkya Rahane and Bhuvneshwar kumar
WPL 2023 Prize Money: बाबो! WPL विजेत्या मुंबई इंडियन्सला PSL पेक्षा तिप्पट रकमेचं बक्षीस; आकडा वाचून व्हाल थक्क

या खेळाडूंना मिळाली बढती...

रवींद्र जडेजाचा ए प्लस श्रेणीत समावेश करण्यात आला आहे. तर हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेलचे देखील प्रमोशन झाल्याचे पाहायला मिळाले आहे. (Latest sports updates)

बी श्रेणीत असलेला हार्दिक पंड्याचा ए श्रेणीत समावेश करण्यात आला आहे. तर अक्षर पटेलचा देखील ए श्रेणीत समावेश करण्यात आला आहे.

Ajinkya Rahane and Bhuvneshwar kumar
MI VS DC FINAL Result: 'दुनिया हिला देंगे' म्हणत मुंबईने घडवला इतिहास! दिल्लीला पराभूत करत पटकावले WPL चे जेतेपद

या खेळाडूंना केलं कॉन्ट्रॅकमधून बाहेर..

भारतीय संघातील अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे आणि अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमार यांना कॉन्ट्रॅकच्या यादीतून बाहेर करण्यात आलं आहे. भुवनेश्वर कुमार हा सी श्रेणीत होता. तर अजिंक्य रहाणे बी श्रेणीत होता. मात्र आता या दोघांनाही थेट बाहेर करण्यात आलं आहे.

अजिंक्य रहाणे गेल्या काही महिन्यांपासून भारतीय संघाच्या बाहेर आहे. तो कमबॅक करण्याच्या प्रयत्नात आहे.

मात्र त्याला कॉन्ट्रॅकमधून बाहेर केलं जाईल असं कोणलाही वाटलं नव्हतं. आता यावरून असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, अजिंक्य राहणेचं भारतीय कसोटी संघात पुनरागमन करणं कठीण आहे. लवकरच तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम करू शकतो.

Ajinkya Rahane and Bhuvneshwar kumar
Issy Wong Hat Trick Video: WPL ची पहिली हॅटट्रिक घेत इस्सीने रचला इतिहास,पाहा तो ऐतिहासिक क्षण - VIDEO

भुवनेश्वर कुमारही कॉन्ट्रॅक मधून बाहेर..

भुवनेश्वर कुमार हा काही महिन्यांपूर्वी भारतीय संघाच्या मुख्य गोलंदाजाची भूमिका पार पाडत होता. मात्र त्याला कॉन्ट्रॅकमधून बाहेर केल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

यावरून स्पष्ट होत आहे की, बीसीसीआय ३३ वर्षीय भुवनेश्वर कुमारला विश्रांती देऊन युवा खेळाडूंना संधी देण्याच्या विचारात आहे.

मात्र त्याने जर आगामी आयपीएल स्पर्धेत चांगली कामगीरी केली तर तो भारतीय संघात पुनरागमन करू शकतो.

Ajinkya Rahane and Bhuvneshwar kumar
Match Fixing In Cricket : मॅच फिक्सिंगचा डाग काही जाईना! या १३ सामन्यांत झाली होती मॅच फिक्सिंग, खळबळजनक खुलासा

कोणत्या श्रेणीत मिळते किती मानधन

बीसीसीआयच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये A+ श्रेणीतील खेळाडूंना सर्वाधिक मानधन दिले जाते. या श्रेणीत बीसीसीआयकडून खेळाडूंना वार्षिक ७ कोटी रुपये दिले जातात, तर ए श्रेणीतील खेळाडूंना ५ कोटी मिळतात. याशिवाय बी श्रेणीतील खेळाडूंना ३ कोटी आणि सी श्रेणीतील खेळाडूला वार्षिक १ कोटी मानधन दिले जाते.

ग्रेड ए प्लस - रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा.

ग्रेड ए - हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, ऋषभ पंत, अक्षर पटेल.

ग्रेड बी - लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, चेतेश्वर पुजारा, मोहम्मद सिराज, सूर्यकुमार यादव, शुभमन गिल.

ग्रेड सी - शिखर धवन, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, इशान किशन, दीपक हुडा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com