ajinkya rahane
ajinkya rahane saam tv

Ajinkya Rahane Love Story: अज्जूची हटके लव्ह स्टोरी! बहिणीच्या मैत्रिणीच्या प्रेमात पडला अन् लग्नाच्या दिवशीच घडला लाजिरवाणा प्रसंग

Ajinkya Rahane Birthday: जाणून घ्या अजिंक्य रहाणेबद्दल न माहित असलेल्या काही रंजक गोष्टी.

Ajinkya Rahane Birthday Special: भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला आव्हान देण्यासाठी सज्ज झाला आहे. ७ जूनपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्याला सुरुवात होणार आहे. हा सामना केनिंगटन ओव्हलच्या मैदानावर पार पडणार आहे.

या सामन्यात भारतीय संघातील अनुभवी खेळाडू अजिंक्य रहाणे कमबॅक करताना दिसून येणार आहे. आज ६ जून रोजी अजिंक्य रहाणे ३५ वा वाढदिवस साजरा करतोय. या खास दिवशी जाणून घ्या अजिंक्य रहाणेबद्दल न माहित असलेल्या काही रंजक गोष्टी.

ajinkya rahane
WTC FINAL: WTC च्या फायनलसाठी दिग्गजाने निवडली प्लेइंग 11, Ajinkya Rahane ला संधी तर दिग्गज ऑलराऊंडरला केलं बाहेर

बहिणीच्या मैत्रिणीवर जडलं प्रेम..

अजिंक्य रहाणेचं वैयक्तिक आयुष्य देखील तितकंच रंजक आहे. त्याचं आपल्याच बहिणीच्या मैत्रिणीवर प्रेम जडलं होतं. बरेच वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला होता.

मात्र लग्नाच्या वेळी त्याला लाजिरवाणं व्हावं लागलं होतं. अजिंक्य रहाणेने दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या लग्नाचा मजेशीर किस्सा सांगितला होता. त्याने म्हटले होते की, 'लग्नाच्या वेळी मला शॉपिंग करायला वेळ मिळाला नव्हता.

मला वाटलं होतं की, माझे कपडे मुलीकडचे घेऊन येतील. मात्र असं काहीच झालं नाही. त्यामुळे मला जीन्स आणि टी-शर्ट घालून लग्नाला यावं लागलं होतं. '

ajinkya rahane
Ajinkya Rahane Comeback: माही है तो मुमकीन है! अजिंक्य रहाणेचं टीम इंडियात जोरदार पुनरागमन

जेव्हा अजिंक्य रहाणे जीन्स आणि टी -शर्ट घालून लग्नाला पोहचला तेव्हा पत्नी राधिकाला खूप राग आला होता. इतकेच नव्हे तर राधिकाच्या कुटुंबातील सदस्यांना देखील राग आला होता. त्यावेळी अजिंक्य रहाणेला जाणवलं होतं की त्याने किती मोठी चूक केली आहे.

अजिंक्य रहाणे आणि राधिका हे दोघेही एकाच सोसायटीमध्ये राहायचे. तसेच राधिका ही अजिंक्य रहाणेच्या बहिणीची मैत्रीण होती.

लग्नाचा मजेशीर किस्सा सांगताना राधिका म्हणाली की, 'अजिंक्य लग्नात पिवळ्या रंगाचं टी-शर्ट आणि जीन्स घालून आला होता. त्यामुळे मला खूप राग आला होता. मात्र मी स्वतःवर नियंत्रण ठेवलं होतं. या कार्यक्रमाला १५०० पेक्षा अधिक लोकांनी हजेरी लावली होती.'

बरेच वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर अजिंक्य रहाणे आणि राधिका हे दोघेही २०१४ मध्ये विवाह बंधनात अडकले होते. आता दोघांना २ मुलं आहेत. (Latest sports updates)

आयपीएल २०२३ स्पर्धेतून कमबॅक...

काही महिन्यांपूर्वी निराशाजनक कामगिरी केल्यामुळे अजिंक्य रहाणेला भारतीय संघातून बाहेर केलं गेलं होतं . मात्र आयपीएल २०२३ स्पर्धेत त्याने जोरदार कामगिरी करत भारतीय संघात पुनरागमन केलं आहे.

आयपीएल २०२३ स्पर्धेसाठी झालेल्या लिलावात चेन्नई सुपर किंग्ज संघाने त्याला ५० लाखांच्या मूळ किमतीत आपल्या संघात स्थान दिले होते. या संधीचा त्याने पुरेपूर फायदा उचलला. त्याने चेन्नईला चॅम्पियन बनवण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे.

या हंगामातील १४ सामन्यांमध्ये ३२६ धावा केल्या आहेत. आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com