Akash Madhwal Best Bowling: मधवालच्या बुलेट स्पीड चेंडूने बदोनीची केली दांडी गुल! स्टंप उडून पडला ५ फूट लांब - VIDEO

Akash Madhwal Bowling: आयुष बदोनीची विकेट घेतल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
akash madhwal
akash madhwaltwitter

LSG VS MI, IPL 2023: आयपीएल २०२३ स्पर्धेतील एलिमिनेटरचा सामना मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने जोरदार कामगिरी करत ८१ धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासह मुंबई इंडियन्स संघाने क्वालिफायर २ मध्ये प्रवेश केला आहे.

आता मुंबईचा सामना गुजरात टायटन्स संघासोबत रंगणार आहे. या सामन्यात विजय मिळवणारा संघ अंतिम फेरीत प्रवेश करणार आहे. युवा गोलंदाज आकाश मधवाल या सामन्याचा हिरो ठरला आहे.

दरम्यान त्याने आयुष बदोनीची विकेट घेतल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

akash madhwal
Virat Kohli Emotional Tweet: जिंकलस भावा! IPL मधून बाहेर होताच विराटने चाहत्यांना दिला खास संदेश

आकाश मधवालचा भन्नाट गतीने टाकलेला चेंडू..

आकाश मधवाल हा मुंबईचा नवखा गोलंदाज आहे. दिग्गज गोलंदाज बाहेर झाल्यानंतर त्याला संघात खेळण्याची संधी मिळाली आहे. या संधीचा त्याने पुरेपूर वापर केला आहे. सध्या तो मुंबई इंडियन्स संघासाठी मॅचविनर गोलंदाज ठरतोय. लखनऊ सुपर जायंट्स संघाविरुद्ध खेळताना त्याने भन्नाट गतीने चेंडू टाकत आयुष बदोनीचा विकेट घेतला आहे.

तर झाले असे की, लखनऊ सुपर जायंट्स संघाची फलंदाजी सुरू असताना १० वे षटक टाकण्यासाठी आकाश मधवाल गोलंदाजाला आला होता. त्यावेळी आयुष बदोनी फलंदाजी करत होता.

या षटकातील चौथा चेंडू त्याने अचूक टप्प्यावर टाकला, जो टप्पा पडून आत आला. या चेंडूत इतकी गती होती की, आयुष बदोनीला हा चेंडू कळायचा आत दांडी गुल झाली होती. आयुष बदोनी केवळ १ धाव करत माघारी परतला. (Latest sports updates)

आकाश मधवालची कामगिरी...

मुंबईने या डावात प्रथम फलंदाजी करताना १८२ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना एकवेळ वाटत होते की, लखनऊचा संघ या धावांचा पाठलाग करू शकतो. मात्र आकाश मधवालने अप्रतिम गोलंदाजी करत सामना मुंबईच्या दिशेने फिरवला.

त्याने या सामन्यात ३.३ षटक गोलंदाजी केली. या दरम्यान त्याने अवघ्या ५ धावा खर्च करत ५ गडी बाद केल्या. त्याने एकाच षटकात २ गडी बाद करत मुंबईला सामन्यात कमबॅक करून दिलं.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर मुंबई इंडियन्स सांधने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्स संघाकडून कॅमेरून ग्रीनने सर्वाधिक ४१ धावांची खेळी केली.

तर सूर्यकुमार यादवने ३३ आणि तिलक वर्माने २६ धावांचे योगदान दिले. या खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्स संघाने ८ गडी बाद १८२ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना लखनऊ सुपर जायंट्स संघाकडून मार्कस स्टोइनिसने ४० धावांची खेळी केली. मात्र मधवालच्या गोलंदाजीसमोर लखनऊचा संघ आव्हान पूर्ण करू शकला नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com