Akash Madhwal On Jasprit Bumrah: तुच रे पठ्ठ्या! बुमराह बाबतच्या तुलनेवर Akash Madhwal चे मन जिंकणारे उत्तर

Akash Madhwal On Jasprit Bumrah Comparison: या सामन्यानंतर त्याने जसप्रीत बुमराह बाबत मोठे वक्तव्य केले आहे.
akash madhwal
akash madhwal saam tv

LSG VS MI,IPL 2023: चेन्नईच्या चेपॉकच्या मैदानावर लखनऊ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पार पडला. या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने लखनऊ सुपर जायंट्स संघाचा एकतर्फी पराभव करत क्वालिफायरमध्ये प्रवेश केला आहे.

लखनऊला या सामन्यात मिळवण्यासाठी १८३ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना लखनऊ सुपर जायंट्स संघाचा डाव अवघ्या १०१ धावांवर संपुष्टात आला.

मुंबईकडून पाच विकेट्स घेणारा आकाश मधवाल या सामन्याचा हिरो ठरला आहे. दरम्यान या सामन्यानंतर त्याने जसप्रीत बुमराह बाबत मोठे वक्तव्य केले आहे.

akash madhwal
IPL Betting News: आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टेबाजी; मुंबई,नागपूरसह दुबईचं कनेक्शन उघड, पुणे पोलिसांची मोठी कारवाई

जसप्रीत बुमराहबाबत केलं मोठं वक्तव्य..

जसप्रीत बुमराह हा मुंबई इंडियन्स संघातील प्रमुख गोलंदाज आहे. मात्र दुखापतीमुळे तो या हंगामात खेळताना दिसून येत नाहीये. तसेच जोफ्रा आर्चर देखील संघाबाहेर आहे. त्यामुळे नवखा गोलंदाज आकाश मधवालला प्लेइंग ११ मध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे.

या संधीचं सोनं करत तो मुंबईच्या विजयाचा शिल्पकार ठरला आहे. जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत तो सुरुवातीच्या आणि अंतिम षटकांमध्ये जोरदार कामगिरी करताना दिसून येतोय.

लखनऊ सुपर जायंट्स संघाविरुद्धचा सामना झाल्यानंतर त्याला जसप्रीत बुमराहबाबत प्रश्न विचारण्यात आला होता.

याबाबत बोलताना तो म्हणाला.' जसप्रीत बुमराह हा त्याच्या स्तरावर आहे आणि मी माझ्या स्तरावर आहे. मी माझी तुलना त्याच्याशी नाही करू शकत. मी येणाऱ्या सामन्यांमध्ये आणखी चांगली कागमिरी करण्याचा प्रयत्न करेल.' (Latest sports updates)

akash madhwal
IPL 2023 Eliminator: लखनऊविरुद्धच्या सामन्यापूर्वी मुंबईसाठी गुड न्यूज; चाहत्यांना फुटल्या आनंदाच्या उकळ्या

आकाश मधवालची जोरदार कामगिरी...

या सामन्यात नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्स संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्स संघाने २० षटक अखेर ८ गडी बाद १८२ धावा केल्या होत्या. मुंबई इंडियन्स संघाकडून कॅमेरून ग्रीनने सर्वाधिक ४१ धावांची खेळी केली. तर सूर्यकुमार यादवने ३३ धावांचे योगदान दिले.

लखनऊ सुपर जायंट्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी १८३ धावांची गरज होती. या धावांचा बचाव करताना आकाश मधवाल हा मुंबई इंडियन्स संघाचा हिरो ठरला.

मुंबई इंडियन्स संघाकडून त्याने ३.३ षटक गोलंदाजी करून अवघ्या ५ धावा खर्च करत ५ गडी बाद केले. यादरम्यान त्याने प्रेरक माकंड, आयुष बदोनी, निकोलस पूरन, रवी बिश्नोई आणि मोहसीन खानला पॅव्हेलियनची वाट दाखवली.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com