
Akash Madhwal Success: मुंबई इंडियन्सने एलिमिनेटर सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सचा पराभव केला. या विजयाचा हिरो ठरला आकाश मधवाल. आकाशने घातक गोलंदाजीनं लखनऊच्या फलंदाजीच्या चिंधड्या उडवल्या. अवघ्या ५ धावा देत ५ विकेट गारद केले आणि आयपीएलच्या इतिहासातील सर्वोत्तम गोलंदाज ठरला. आकाशच्या घातक गोलंदाजीने दिग्गज क्रिकेटपटूंची मने जिंकली. मैदानावरील आकाशच्या वादळानंतर ट्विटरवर प्रतिक्रियांची त्सुनामी आली. (Latest sports updates)
मुंबई इंडियन्सने लखनऊसमोर १८३ धावांचे आव्हान ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या लखनऊला आकाश मधवालने पहिला झटका दिला. त्यानंतर डावाच्या दहाव्या षटकात दोन मोठे तडाखे दिले. त्याने बदोनी आणि नंतर निकोलस पुरनला बाद केले.
आकाशच्या या तडाख्यानंतर लखनऊ पुन्हा सावरलाच नाही. अखेरच्या षटकांत आकाशने बिश्नोई आणि मोहसिनला बाद करून विकेटचा पंच मारला. त्याच्या गोलंदाजीवर दिग्गज फलंदाज विरेंद्र सेहवाग फिदा झाला. त्याने लागलीच ट्विट करून कौतुकाचा सेतू बांधला.
विरेंद्र सेहवागने आकाश मधवालचं तोंडभरून कौतुक केलं. आकाश मधवालने लीगच्या अखेरच्या सामन्यात चार विकेट घेतले होते. त्यानंतर एलिमिनेटर सामन्यात पाच गडी गारद केले. युवा खेळाडूंची चांगली कामगिरी बघून खूप आनंद होतो. हे पर्व असे ठरले ज्यात अनुभवी खेळाडूंची दमदार कामगिरी बघायला मिळाली आणि अनेक नवीन खेळाडूंनी आपली छाप सोडली आहे, असे विरेंद्र सेहवाग म्हणाला.
जसप्रीत बुमराहनेही ट्विटमधून आकाशचे कौतुक केले. आकाश मधवालचा काय स्पेल ठरला...अभिनंदन मुंबई पलटण..., असे ट्विट जसप्रीतने केले.
महान गोलंदाज अनिल कुंबळेनेही आकाश मधवालवर कौतुकाचा वर्षाव केला. हायप्रेशर गेममध्ये खूपच जबरदस्त गोलंदाजी. आकाश मधवाल, ५/५ क्लबमध्ये तुझं स्वागत!, असे कुंबळे म्हणाला.
आकाश मधवाल, काय जबरदस्त गोलंदाजी. मुंबई इंडियन्स एक असं विद्यापीठ आहे, तिथलं ग्रॅज्युएशन तुम्हाला सुपरस्टार बनवतो, असं ट्विट इरफान पठाणनं केलं.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.