ऑलिम्पिकमध्ये ऑस्ट्रेलियाला मोठा झटका ! Alex de Minaur ला कोरोनाची लागण

अॅलेक्स डी मीनाऊर (Alex de Minaur ) हा जगातील 17 व्या क्रमांकाचा खेळाडू आहे. तो ऑस्ट्रेलियाचा अव्वल एकेरी खेळाडू आहे.
ऑलिम्पिकमध्ये ऑस्ट्रेलियाला मोठा झटका ! Alex de Minaur ला कोरोनाची लागण
Alex de MinaurTwitter/ @alexdeminaur

टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) ऑस्ट्रेलियाला मोठा झटका बसला आहे. टेनिसपटू अ‍ॅलेक्स डी मीनाऊर (Alex De Minaur) हा कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) आल्याचे वृत्त समोर आले आहे. एओसीचे शेफ डी मिशन (AOC’s Chef de Mission), इयान चेस्टरमन (Ian Chesterman) यांनी या वृत्ताची पुष्टि दिली आहे. ते म्हणाले, “आम्हाला सांगण्यात आले की अ‍ॅलेक्स डी मीनौरला कोरोनाची लागण झाल्याचे आढळले आहे. त्याची 96 आणि 72 तास अगोदर चाचणी केली होती. ज्यात तो कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.

"परिणामी, दुर्दैवाने अ‍ॅलेक्सचे टोकियो ऑलिम्पिकमध्ये ऑस्ट्रेलियन संघात सहभागी होण्याचे स्वप्न भंगले आहे". '' आम्ही अलेक्ससाठी खूप नाराज आहोत, तो आम्हाला म्हणाला आहे की तो पुर्णपणे तुटलेला आहे. तो यायला सक्षम नाहीये. ऑलिम्पिकमध्ये ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करण्याचे अलेक्सचे बालपणाचे स्वप्न होते. पण ते एक स्वप्नच राहिले. पण त्याने उर्वरित संघाला शुभेच्छा दिल्या आहेत". अॅलेक्स डी मीनौर हा जगातील 17 व्या क्रमांकाचा खेळाडू आहे. तो ऑस्ट्रेलियाचा अव्वल एकेरी खेळाडू आहे.

Alex de Minaur
IND vs ENG: खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर; BCCI चा मोठा निर्णय

दुसरीकडे, 2021 चा विम्बल्डन चॅम्पियन नोवाक जोकोविचने पुष्टी केली की तो टोकियो ऑलिम्पिकमध्ये भाग घेणार.आहे. गेल्या आठवड्यात त्याने 20 वे मोठे ग्रँड स्लॅम विजेतेपद जिंकल्यानंतर नोव्हाक जोकोविच म्हणाला "गेल्या काही दिवसांत मी काहीतरी ऐकले होते त्यामुळे हे कारण 50-50 सारखे आहे. तो पुढे म्हणाला की, गेल्या आठवड्यात ऑलिम्पिक टेनिस सामन्यांमध्ये चाहत्यांच्या अनुपस्थितीबद्दलची बातमी जाणून खूप निराश झालो''. त्याने एका चाहत्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात तो चाहता मी टोकियोला येण्यासाठी फ्लाईट बुक केले आहे. निराश होऊ नका असे म्हणताला दिसत आहे.

Edited By: Pravin Dhamale

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com