
भारतीय संघाने श्रीलंकेला पराभूत करत आशिया चषक २०२३ स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरलं आहे. अंतिम सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेवर १० गडी राखून विजय मिळवला आहे. येत्या ५ ऑक्टोबरपासून वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेला प्रारंभ होणार आहे.
या स्पर्धेपूर्वी आशिया कप जिंकल्याने भारतीय संघाच्या आत्मविश्वासात भर पडली आहे. मात्र संघातील अष्टपैलू खेळाडु रविंद्र जडेजाने भारतीय संघाची चिंता वाढवली आहे.
रविंद्र जडेजा हा भारतीय संघातील प्रमुख खेळाडूंपैकी एक आहे. त्याने फलंदाजीत, गोलंदाजीत आणि क्षेत्ररक्षण करताना अनेकदा मोलाचं योगदान दिलं आहे. मात्र भारतीय संघाची चिंता वाढवणारी बातमी म्हणजे,रविंद्र जडेजाची फलंदाजी. वनडे वर्ल्डकप तोंडावर असताना रविंद्र जडेजा धावा करण्यासाठी संघर्ष करताना दिसून आला आहे.
डावखूरा गोलंदाज रविंद्र जडेजा आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. मात्र त्याला आशिया चषकात नावाला साजेशी फलंदाजी करता आली नाही. त्याची गेल्या १० सामन्यातील कामगिरी पाहिली तर त्याला एकाही सामन्यात २० चा आकडा देखील पार करता आलेला नाही. (Latest sports updates)
आशिया चषक २०२३ स्पर्धेत तो ३ वेळेस फलंदाजीला आला. ज्यात पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात त्याने १४, श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात ४ आणि बांगलादेशविरूद्धच्या सामन्यात त्याने ७ धावांची खेळी केली. यापूर्वी वेस्टइंडीजविरूद्धच्या वनडे मालिकेतील ३ सामन्यांमध्ये त्याला केवळ ३२ धावा करता आल्या होत्या.
जडेजाची फलंदाजी भारतीय संघासाठी महत्वाती का?
जडेजाला आपली भूमिका चांगल्याने माहित आहे. तो गोलंदाजी करताना गडी बाद करतोय.क्षेत्ररक्षण करताना धावांचा बचाव करतोय. मात्र फलंदाजीत तो धावा करू शकत नाहीये.
भारतीय संघातील टॉप ऑर्डर आणि मिडील ऑर्डरचे फलंदाज स्वस्तात माघारी परतल्यानंतर रविंद्र जडेजाची जबाबदारी आणखी वाढते. कारण शेवटच्या षटकांमध्ये येऊन तो आक्रमक फलंदाजी करू शकतो. मात्र धावा करत नसल्याने टीम इंडियाची चिंता वाढली आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.