Ambati Rayudu Retirement: फायनल सामन्याआधीच CSK ला मोठा धक्का! बड्या खेळाडूने केली निवृत्तीची घोषणा! ट्विट करत म्हणाला...

CSK vs GT Final: या सामन्यापूर्वीच चेन्नई सुपर किंग्ज संघातील खेळाडूने निवृत्तीची घोषणा केली आहे.
csk team
csk team ipl

CSK vs GT Final, 2023: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज आयपीएल २०२३ स्पर्धेतील अंतिम सामना रंगणार आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणारा गुजरात टायटन्स आणि एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणारा चेन्नई सुपर किंग्ज संघ आमने सामने येणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वीच चेन्नई सुपर किंग्ज संघातील खेळाडूने निवृत्तीची घोषणा केली आहे.

csk team
CSK Vs GT IPL Final 2023: फायनलपूर्वी CSK च्या चिंतेत वाढ! या कारणामुळे IPL ची ट्रॉफी निसटणार?

चेन्नई सुपर किंग्ज संघ आज दहाव्यांदा अंतिम सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. तर या संघाला पाचवे जेतेपद मिळवण्याची संधी असणार आहे. या सामन्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्ज संघातील अनुभवी खेळाडू अंबाती रायडूने आयपीएल स्पर्धेतून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली आहे. त्याने या सामन्यापूर्वी ट्विट करत ही माहिती दिली आहे. यावेळी त्याने आपला निर्णय बदलणार नसल्याचीही माहिती दिली आहे.

अंबाती रायडूने ट्विट करत लिहिले की, '२ सर्वोत्तम संघ मुंबई आणि चेन्नई, २०४ सामने, १४ हंगाम, ११ प्लेऑफ, ८ अंतिम सामने, ५ जेतेपद, कदाचित सहावे आज मिळेल. मी असा निर्णय घेतला आहे की, आजचा सामना हा माझा आयपीएल कारकिर्दीतील अंतिम सामना असेल. मी ही स्पर्धा खेळण्याचा मला खरोखर आनंद झाला. तुम्हा सर्वांचे आभार, आता निर्णय बदलणार नाही.' (Latest sports updates)

अंबाती रायडूची कारकीर्द..

अंबाती रायडूने २०१९ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम केले होते. आज तो आपल्या आयपीएल कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. त्याच्या आयपीएल कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्याने २०३ सामन्यांमध्ये २८.३ च्या सरासरीने ४३२९ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने २२ अर्धशतके आणि १ शतक देखील झळकावले आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी खेळण्यापूर्वी त्याने मुंबई इंडियन्स संघाचे देखील प्रतिनिधित्व केले आहे. मुंबई इंडियन्स संघाला जेतेपद मिळवून देण्यात अंबाती रायडूने मोलाची भूमिका बजावली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com